Homeपुणेचिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांना तेजस्विनी पुरस्कार

चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांना तेजस्विनी पुरस्कार

Newsworldmarathi Pune : प्रशासकीय सेवेत प्रदीर्घकाळ प्रामाणिकपणाने दिलेल्या योगदानाबद्दल चिंतामणी ज्ञानपीठाच्या वतीने पुणे महापालिकेच्या उपायुक्त आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्कार देऊन आज विशेष सन्मान करण्यात आला. गणेश कला क्रीडा मंदिरात रंगलेल्या सोहळ्यामध्ये हजारो लोकांच्या उपस्थितीत त्यांच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा करण्यात आला.

Advertisements

माजी आमदार अश्विनीताई जगताप यांच्या हस्ते शाल, मोत्याची माळ, ज्ञानेश्वरी, श्रीफळ आणि जिजाऊ-शिवबा यांचे शिल्प असलेले विशेष स्मृतीचिन्ह देऊन आशा राऊत यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार मा. अश्विनीताई जगताप, ऐश्वर्या रेणुसे, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलासराव मडगिरी, उद्योजक नवीनशेठ लायगुडे, नगरसेवक राजेंद्रजी जगताप, वरिष्ठ पत्रकार व लेखक पराग पोतदार, विलासराव भणगे, भास्कर शेटे, सचिनजी डिंबळे, मुख्याध्यापिका शर्मिला पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी विद्यार्थ्यानी मल्लखांब प्रात्यक्षिकासह विविध नृत्यांतून कलागुण सादर केले. उपस्थितांना संबोधित करताना अश्विनीताई जगताप म्हणाल्या, तेजस्विनी पुरस्काराने आज ज्यांना सन्मान केल्या त्या आशाताई राऊत यांचे काम खरोखरीच उल्लेखनीय आहे. अत्यंत प्रामाणिकपणे आणि जिद्दीने त्यांनी आजवरची वाटचाल केलेली आहे. तेजस्विनी पुरस्काराच्या निमित्ताने मुलांचा उत्साह पाहताना जाणवते की हा आनंदाचा महोत्सव आहे. मल्लखांबाची चित्तथरारक प्रात्यक्षिके पाहताना थक्क व्हायला होत होते. मुलांना माझे हेच सांगणे आहे, की खूप मोठे व्हा पण आपल्या आई वडिलांना आणि गुरुजनांना कधीही विसरू नका. आपल्या घडवणारे आणि आपल्यावर प्रेम करणारे तेच असतात. त्यांना मान द्यायला शिका आणि आपल्या देशाचे नाव मोठे करा.

सत्काराला उत्तर देताना आशाताई राऊत म्हणाल्या, १९९८ पासून मी प्राथमिक शिक्षिका म्हणून काम केले आहे. २००८ पासून मी प्रशासनात विविध जबाबदाऱ्यांवर काम करते आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. तो पुरस्कार मला मिळाला याचा आनंद आहे. अशा पुरस्कारांतून प्रेणा मिळते. अधिक जोमाने काम करण्याचे बळ मिळते आणि जबाबदारीचे भानही येते. त्याच भावनेतून मी या पुरस्काराचा स्वीकार करते आहे. एक आगळावेगळा आनंद देणारा आजचा कार्यक्रम होता.

News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments