Homeपुणे‘पुरुषोत्तम‌’चे लॉटस्‌‍चे गुरुवारी वितरण

‘पुरुषोत्तम‌’चे लॉटस्‌‍चे गुरुवारी वितरण

Newsworldmarathi Pune : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचे लॉटस्‌‍ गुरुवार, दि. 26 डिसेंबर रोजी काढण्यात येणार असून स्पर्धेला शुक्रवार दि. 27 रोजी सुरुवात होणार आहे.

Advertisements

महाअंतिम स्पर्धा दि. 27 ते दि. 29 डिसेंबर 2024 या कालावधीत पुण्यात होणार आहे. अंतिम स्पर्धेत पोहोचलेले सर्व संघ शुक्रवारी (दि. 26) पुण्यात दाखल होणार आहेत. त्यानंतर स्पर्धेचे लॉटस्‌‍ काढण्यात येणार आहे. पुण्यासह अमरावती, रत्नागिरी, संभाजीनगर आणि कोल्हापूर विभागातील पारितोषिकप्राप्त एकांकिकांचे सादरीकरण होणार असून यातून महाअंतिम फेरीतील विजेता ठरणार आहे. महाअंतिम फेरी भरत नाट्य मंदिर येथे पाच सत्रात होणार आहे. दि. 27 आणि दि. 28 रोजी सकाळी 9 ते 1 आणि सायंकाळी 5 ते 9 आणि दि. 29 रोजी सकाळी 9 ते 1 या वेळात स्पर्धा होणार आहे. पारितोषिक वितरण सभारंभ दि. 29 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला असून पारितोषिकांचे वितरण ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांच्या हस्ते होणार आहे.

News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments