Newsworld Marathi Nagpur : Mohan Bhagwat : लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा कमी असेल तर तो समाज पृथ्वीवरून नष्ट होतो. त्यामुळे दोन पेक्षा जास्त म्हणजे कमीत कमी तीन अपत्य असावेत, असे अत्यंत महत्त्वाचे विधान करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केले. नागपुरात कठाळे कुल संमेलनात ते बोलत होते. या संमेलनात मोहन भागवत यांच्या आधी वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींनी सध्या अनेक तरुण दांपत्य एकही अपत्य जन्माला घालण्यास तयार नाही, असा उल्लेख करत चिंता व्यक्त केली होती. त्याच मुद्द्याला पुढे घेऊन जात सरसंघचालकांनी अत्यंत महत्त्वाचे विधान केले.हिंदूंच्या संख्येत 7.8 टक्क्यांनी घट पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने 1950 ते 2015 या काळात भारतात हिंदू बहुसंख्य होते, असं स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे आता हिंदूंची लोकसंख्येत 7.8 टक्क्यांनी घट झाल्याचेही स्पष्ट केले आहे. तर दुसऱ्या बाजूला भारताच्या शेजारील राष्ट्रांमध्ये त्या देशातील प्रमुख धर्मियांची लोकसंख्या वाढत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. शिवाय, यूपीएससीत मराठी यशवंतांचा टक्क घसरल्याचेही समोर आले आहे.