Newsworldmarathi Pune : के जी टू पि जी शिक्षणात प्राथमिक शाळेपासून काॅलेजपर्यंत शिकवणे त्या तुलनेने सोपे आहे मात्र तीन ते पाच वर्षाच्या चिमूरड्यांना सांभाळत आयुष्यभराचे संस्कार करणे तितकेसे सोपे नाही. शिवाय मानधनात तफावत असूनही भविष्यातील आदर्श नागरिक खऱ्या अर्थाने बालवाडीत घडतात. तीन ते पाच वर्षात मेंदूचा विकास अधिक गतीने होत असल्याने बालवर्गात समृद्ध अनुभव देणे महत्त्वाचे असते. हे अनुभव बालवाडी शिक्षिका खूप कष्टाने आणि प्रयत्नपूर्वक देत आहेत असे प्रतिपादन बॅ नाथ पै संस्कार केंद्र आयोजित बाल अभिनय गीत स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी अध्यक्षीय मनोगतात ॲड संपत कांबळे यांनी केले.
स्वातंत्र्यसैनिका स्व विमलताई गरुड यांनी ४५ वर्षांपूर्वी बालचमूंना व्यासपीठ मिळावे या हेतूने या स्पर्धा सुरू केल्या. या वर्षी या स्पर्धेत पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील २० बालवाडी संघ स्पर्धेत उतरले होते. संस्कारक्षम अशी बहारदार गीते स्वतः रचत संबंधित शाळेतील शिक्षिकांनी सादर केली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बांधकाम व्यावसायिक सुदर्शन इंगळे, उद्योजक क्रिष्णा आरगुळा, अंजली अरगुळा, मिलिंद पानसरे, महादेव खंडागळे उपस्थित होते. बालवर्गातील हे बालचमू एवढ्या उत्तम पद्धतीने गीत सादर करु शकतात त्याबद्दल क्रिष्णा आरगुळा यांनी आश्चर्य व्यक्त केले. महादेव खंडागळे यांनी शिक्षिकांना भावी शैक्षणिक समृद्धीसाठी तयार राहण्याचे आवाहन केले.
बॅ नाथ पै संस्कार केंद्राच्या वतीने दरवर्षी बालवाडी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षिकांस गुणवंत शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात येतो.त्या पुरस्काराचे मानकरी शिरिष कुमार बालक मंदीर हडपसरच्या मनिषा पवार व ज्ञानेश पूर्वप्राथमिक शाळा बालाजीनगरच्या वृषाली देशपांडे या ठरल्या.
यावेळी राष्ट्र सेवादलाचे निष्ठावंत कार्यकर्ते दिवंगत सलीम शेख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कॅलेंडर प्रकाशन केले गेले
यावेळी व्यासपीठावर सचिव सोपान बंदावणे, शिवाजी खांडेकर, मीना काटे,रजनीताई धनकवडे,मंगला कांबळे,तुकाराम कदम उपस्थित होते..
कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक कोषाध्यक्ष प्रा भगवान कोकणे यांनी केले. सूत्रसंचालन विठ्ठल शेवते,शीतल खेडकर यांनी केले,आभार महादेव हेरवाडकर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय ससे, तेजस्विनी फुलफगर, संगिता गोवळकर, मोनिका पोटे, शीतल रूपनूर ,लक्ष्मी कांबळे, नवनाथ लोंढे, प्रकाश कदम निशा नाईकनवरे यांनी परिश्रम घेतले.स्पर्धेचे परीक्षण विश्वास पांगारकर,निधी घारे, जलाल सय्यद यांनी केले.
स्पर्धेचा निकाल
प्रथम : हिंदुस्थान ॲंटीबायोटीक्स स्कूल पूर्वप्राथमिक शाळा , पिंपरी,पुणे.
द्वितीय : ज्ञानेश पूर्वप्राथमिक शाळा बालाजीनगर, पुणे
तृतीय : महेश्वरी प्रांगण प्री स्कूल धायरी , पुणे
तृतीय विभागून – वनाझ परिवार विद्यामंदिर पूर्व प्राथमिक विभाग कोथरूड पुणे.
स्वरचित
१) सविता लोखंडे ( हिंदूस्थान ॲंटीबायोटीक्स स्कूल, पूर्वप्राथमिक
२) रविंद्र यादव ( आशापुष्प बालक मंदिर,नर्हेगाव,पुणे)