Newsworldmarathi Pune : आज सर्वच क्षेत्रामध्ये महिलांना आघाडी घेतली आहे आजच्या आंतरराष्ट्रीय उद्योजकता परिषदेत महिलांचे संख्या मोठ्या प्रमाणात दिसत आहे त्यामुळे आता महिला उद्योजिकांचे युग सुरू झाल्याचे राज्याचे उच्चभ्रू तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले .ते उद्योजकता परिषदेत बोलत होते .यावेळी पिंपरी चिंचवड विद्यापीठाने हा कार्यक्रम यशस्वी करून शिक्षण क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले .
पुढे ते म्हणाले की आज भारत देशाकडे जगातील गुंतवणुकीचा ३७ टक्के वाटा आहे .त्यामुळे जगातील सर्व कंपन्या गुंतवणुकुसाठी आपल्याकडे येतात .याच गोष्टीचा विचार आता नव्याने उद्योजक होणाऱ्या पिढीने करून यामध्ये आपले स्थान निर्माण करावे असे पाटील यांनी आवाहन केले .
या सत्रात बिल्डिंग मीनिंगफुल पार्टनरशिप बिटविन युनिव्हर्सिटी एंड बिझनेसस ऑर्गनायझेशन या विषयावर महत्त्वपूर्ण असे आंतराष्ट्रीय चर्चासत्र झाले त्याला जगभरातील शंभरहून अधिक मान्यवर सहभागी झाले होते .यावेळी उपस्थितांनी उस्फूर्त असा प्रतिसाद दिला.
यावेळी बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हनुमंत गायकवाड यांनी आपल्या आयुष्यात उद्योजक होण्यासाठी केलेला संघर्ष सांगून नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देत मार्गदर्शन केले .
दुबई प्रशासनातील अधिकारी सोमनाथ पाटील यांनी दुबईतील उद्योग विश्वाची माहिती उपस्थितांना दिली. समतोलाचा सत्रात सहभागी नव उद्योजकांसाठी त्यांच्या उद्योजकीय संकल्पनांना वाव मिळण्यासाठी स्पर्धा आयोजित केली होती त्यानुसार एकूण तीन विभागात ९ संघ विजयी करण्यात आले त्यांना एक लाख ,पन्नास हजार आणि पंचवीस हजार अशी अनुक्रमे बक्षिसे देऊन प्रोत्साहन देण्यात आले .
दोन दिवसाच्या या परिषदेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी,डॉ.अभय जेरे,समीर मैत्रगोत्री हॉर्वर्ड विद्यापीठ अमेरिका,डॉ.विनोद मोहितकर संचालक तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र शासन,शैलेंद्र देवळणकर संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र शासन,नील फिलिप सिटी विद्यापीठ न्यूयॉर्क,डॉ.प्रणिता सेन आदि मान्यवर विचारवंत आणि तज्ञ मार्गदर्शकानी विविध विषयावर उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन केले .
आंतरराष्ट्रीय उद्योजकता परिषदेच्या समारंभास माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील गणेश नटराजन ,सिंगापूरचे उद्योजक आनंद गोविंदलूरी,डॉ.राजेंद्र जगदाळे ,पिंपरी चिंचवड ट्रस्ट चे अध्यक्ष राहुल काळभोर,कार्यकारी संचालक गिरीश देसाई ,संयोजक सचिन इटकर यासह देशातील आणि प्रदेशातील प्रमुख वक्ते आणि सहभागी उद्योजक उपस्थित होते.