Homeपुणेप्रियंका बनतेय तरुणीची 'आयडॉल'

प्रियंका बनतेय तरुणीची ‘आयडॉल’

Newsworldmarathi Pune : भारतीय महिला खो-खो संघाची कर्णधार म्हणून वेगळी ओळख करून देणारी प्रियंका इंगळे आता तरुणांची एक आयडॉल बनली आहे.भारतात खेळवण्यात आलेल्या पहिल्याच खो-खो वर्ल्डकपवर भारतीय संघाने नाव कोरले आहे. भारत हा खो-खो चा पहिला विश्वविजेता संघ ठरला आहे. नवी दिल्ली येथे आज (दि.9) खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने नेपाळचा 38 गुणांच्या मोठ्या फरकाने एकतर्फी पराभव करत विजेतेपद पटकावले. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापासून प्रत्येक सामन्यात वर्चस्व राखणाऱ्या भारतीय महिला संघाने अंतिम फेरीतही अशाच प्रकारे चमक दाखवली. टीम इंडियाने नेपाळचा 78-40 असा पराभव करत विश्वचषकावर नाव कोरलंय. खो-खो हा भारतीय खेळ असून या खेळाचा विश्वचषक पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला होता.

Advertisements

नवी दिल्लीत झालेली पहिली जागतिक अजिंक्यपद खोखो स्पर्धा जिंकून विश्वविजेता ठरलेल्या भारताच्या पुरुष आणि महिला संघांत एक दोन नव्हे तर तब्बल पाच महाराष्ट्रीय खेळाडू आहेत. यामध्ये देशाला खो-खो विश्वविजेतेपद जिंकणाऱ्या पुरुष आणि महिला संघात महाराष्ट्राचे भरभरुन योगदान आहे. यामध्ये महाराष्ट्रीयन, पुण्याचा प्रतिक, बीडची प्रियांका यांनी कर्णधारपदाची धुराही सांभाळली आहे.

भारतीय महिला संघाच्या कामगिरीत संघाची कर्णधार प्रियंका इंगळेनं दमदार कामगिरी केली. विशेष म्हणजे प्रियंका ही बीडची असून तिच्या या विक्रमामुळं बीडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सोबतच बीडला जागतिक पातळीवर तीनं ओळख मिळवून दिली आहे. या खो-खो सामन्याच्या वेळी प्रियंकाचे आई आणि वडील दोन्हीही हा सामना पाहत होते. प्रियंकाच्या या कामगिरीमुळं राज्यातूनच नव्हे तर देशातून तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. यासोबतच तिचे आई-वडील हनुमान इंगळे व सविता इंगळे यांच्यावर देखील नातेवाईकाकडून व मित्र परिवाराकडून कौतुकांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. प्रियंकाच्या आई आणि वडीलांनी देखील तिच्या या यशानंतर मुलीचा अभिमान वाटत असल्याचं म्हटलंय.

News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments