Newsworldmarathi Pune : गेली 35 वर्षे पर्वती आणि जनता वसाहत परिसरात निस्वार्थीपणे काम करताना मिळालेल्या समाधानाचा उल्लेख करताना सामाजिक कार्यकर्ते शिवाजीभाऊ गदादे यांनी त्यांच्या कार्याची दिशा आणि उद्देश स्पष्ट केला आहे. त्यांनी सांगितले की, या भागाचा विकास, नागरिकांच्या समस्या सोडवणे आणि परिसराचा कायपालट घडवून आणणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन काम केले. गदादे परिवार हा नेहमी समाजकारणाशी जोडलेला असून, निस्वार्थी सेवा हेच त्यांच्या कार्याचे प्रमुख सूत्र राहिले आहे. त्यांच्या या सेवाभावी कार्यामुळे विशेषतः माता भगिनींचे प्रेम व पाठिंबा त्यांना मोठ्या प्रमाणात मिळाला आहे.
सामाजिक कार्यकर्ते शिवाजीभाऊ गदादे पाटील यांच्या वाढदिवसाच्यानिमित्त हळदी कुंकू आणि वाण वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शिवाजीभाऊ गदादे यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
दरवर्षी प्रमाणे या वर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला. जवळपास 15 ते 20 हजार महिलांना यावेळी वाण वाटप करण्यात आले. पर्वती मतदार संघातील हजारो महिला यावेळी उपस्थित होत्या.
माजी नगरसेविका प्रिया गदादे पाटील म्हणाल्या, हा कार्यक्रम माझी आई स्वर्गीय छायाताई यांनी सुरु केला. महिलांना यातून एक समाधान आनंद आणि प्रोत्साहन मिळावे या हेतूने हा कार्यक्रम सुरु केला. आज 20 वर्ष झाले या कार्यक्रमाला महिलांचा खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे हे पाहून खूप आनंद वाटतो. इथून पुढेही महिलांसाठी विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.
सामाजिक कार्यकर्ते प्रेम गदादे म्हणाले, आई वडिलांमुळे मला समाज कार्याची प्रेरणा मिळाली आज या परिसरातील नागरिकांची एक नातं जोडलं आहे. हळदी कुंकू हे निमित्त आहे पण नागरिकांचे प्रेम पाहून आनंद वाटतो. इथून पुढेही या परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहणार..
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, वारकरी सेवा प्रतिष्ठान आणि सामाजिक कार्यकर्ते शिवाजीभाऊ गदादे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.