Homeमुंबई'मुंबई-पुणे एक्सप्रेस वे' आजपासून तीन दिवस बंद राहणार

‘मुंबई-पुणे एक्सप्रेस वे’ आजपासून तीन दिवस बंद राहणार

Newsworldmarathi Mumbai : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील डोंगरगाव/कुसगाव येथे गर्डर्स बसविण्याच्या कामामुळे वाहतुकीसाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक 22, 23 आणि 24 जानेवारी रोजी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत असेल. या काळात वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जाणार आहे. तरी या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी दिलेल्या वेळेत प्रवासाचे नियोजन योग्य प्रकारे करावे, तसेच पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

डोंगरगाव/कुसगाव येथे गर्डर्स बसविण्याच्या कामामुळे 22, 23, आणि 24 जानेवारी रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक वळवण्यात येणार आहे. वळवण (किमी 54/700) ते वरसोली टोल नाका मार्गे ही वाहतूक देहूरोडमार्गे पुण्याकडे वळवली जाईल. दुपारी 3 वाजल्यानंतर मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा एक्सप्रेसवेच्या पुणे वाहिनीवरून सुरू होईल. महत्त्वाचे म्हणजे, पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक एक्सप्रेसवेवर नियमितपणे सुरू राहणार आहे. प्रवाशांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार प्रवासाचे नियोजन करावे.

एक्सप्रेस वे वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी वरील विषयाच्या अनुषंगाने आपल्या प्रवासाचे नियोजन करावे. या कालावधीदरम्यान वाहनचालकांना काही अडचण असल्यास मदतीसाठी मुंबई- पुणे एक्सप्रेस वेच्या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्र. 9822498224 किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या 9833498334 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी तुषार अहिरे यांनी केले आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments