Newaworldmarathi Pune : “संघर्षातून घडलेल्या माणसाला परिस्थितीची जाणीव असते. त्यातून त्याच्या ज्ञानाची समज अधिक व्यापक झालेली असते. त्यामुळे संघर्षातून घडलेला माणूस आयुष्यात नेहमी यशाच्या मार्गावर चालत राहतो. आज विभक्त कुटुंब पद्धती, परस्परांतील त्वेषामुळे समाज माणुसकीला दुय्यम स्थान देऊ लागला आहे. मात्र, माणुसकीच्या भिंती भक्कम करण्याचे काम आपल्याला करावे लागेल, त्यासाठी परस्परांतील संवाद गरजेचा आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
जीवन करपे लिखित मायमिरर पब्लिशिंग हाऊस प्रकाशित ‘संघर्ष माझा सोबती – पुणे ते जर्मनी’ पुस्तकाचे प्रकाशन डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. उद्यान प्रसाद मंगल कार्यालयात आयोजित सोहळ्यात माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रशेखर दैठणकर, उद्योजक विजय ढेरे, कायदे अभ्यासक श्रीकांत अगस्ते, वरिष्ठ पत्रकार दिगंबर दराडे, विनोद सातव, जीवन करपे, सौ. पल्लवी करपे आदी उपस्थित होते.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “मनाची शुद्धता, प्रामाणिकपणा, संस्काराचे महत्त्व, एकमेकांचा आदर, प्रेमभावातून घडलेले जीवन करपे त्यांच्या आयुष्यात हीच मूल्ये जगत आहेत. उद्योग-व्यवसायामुळे जर्मनीत स्थायिक झाले असले, तरी भारताविषयी, कुटुंबाविषयी त्यांच्या मनात असलेली आस्था, अभिमान आणि कुटुंबाला जोडून ठेवण्याचे कसब त्यांच्यातील माणूस प्रभावीपणे दिसून येतो. भारतातले उत्तम परदेशात न्यावे, आणि तिकडचे चांगले इकडे आणावे, या विचारांवर त्यांचे काम सुरु आहे. माणसामाणसातील, धर्मा-धर्मातील संवाद वाढविण्याला त्यांचे असलेले प्राधान्य मला महत्वाचे वाटते.”


Recent Comments