Newsworldmarathi Pune : लोकप्रतिनिधी हा नागरिकांच्या तक्रारी सोडवणे इतक्यापुरता मर्यादित नसतो. त्याने नागरिकांना भेटून त्यांची मत जाणून घ्यावीत अणि यातून नागरिकांशी संवाद कायम ठेवावा ही सर्वसामान्यांची अपक्षा असते. हीच अपेक्षा पूर्ण करण्यासाठीच पुण्यात दर महिन्याला “खासदार जनसंपर्क सेवा अभियान राबवण्यात येत आहे. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या या अभियाना पुणेकरांचा वाढता उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे शिवाजीनगर मतदारसंघात झालेल्या खासदार जनसंपर्क सेवा अभियानात अधोरेखीत झाले.
पुणेकरांनी आपला खासदार म्हणून मोहोळ यांची भरघोस मताधिक्याने निवड केली. त्याचा योग्य सन्मान राखण्यासाठी खासदार जनसंपर्क सेवा अभियान सुरू करण्यात आले. यात खासदार मोहोळ यांच्यासह मतदारसंघाचे आमदार, माजी नगरसेवक असे स्व लोकप्रतिनिधी उपस्थित असतात.याची सुरूवात कोथरूड मतदारसंघातून झाली. आतापर्यंत कोथरूडसह कसबा, कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर मतदारसंघात हा कार्यक्रम झाला. हा कार्यालय तास-दोनतासांचा कार्यक्रम असणार या समजुतीला सुरूवातीपासून छेद दिला गेला. प्रत्येक मतदारसंघात किमान पाच ते सहा तास म्हणजे अखेरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून त्याचे समाधान करूनच कार्यक्रमाची सांगता प्रत्येक मतदार संघात झाली.

या ठिकाणी महानगरपालिका, राज्य शासनाचे अधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित असतात. नागरिकांच्या तक्रारी किंवा सूचना खासदार पहिल्यांदा ऐकून, त्यावर त्यांना योग्य अधिकाऱ्याकडे पाठवतात. तक्रारीचा निपटारा जागेवरच करण्यावर त्यांचा भर असतो. केंद्र, राज्य सरकार, महानगरपालिकेच्या कल्याणकारी योजनांची महिती तेथे उपस्थित राहणार असलेले भाजपचे कार्यकर्ते करून देत नागरिकांकडून अर्ज भरून घेतात. सर्व प्रकारचे सहाय्य नागरिकांना करण्यासाठी कार्यकर्ते राबत असतात.
नागरिकांच्या चहा, पाणी, नाष्टा किंवा जेवण याचीही काळजी अभियानस्थळी घेतलेली असते. या अभियानात केवळ तक्रारी सोडवल्या जात नाहीत तर नागरिकांचे कोणत्याही सार्वजनिक हिताच्या सूचना, संकल्पना ऐकून घेतल्या जातात. त्याची लिखीत नोंद घेतली जाते. चांगल्या संकल्पना लेखी स्वरूपात मांडण्याची संधी नागरिकां इथे दिली जाते. तसेच प्रशासनाशी संवाद साधण्याची संधी दिली जाते. शासनाच्या कामाचीही महिती देण्याचा संधी या अभियानात मिळते. त्यातून नागरिकांचे गैरसमज दूर केले जातात.
खासदार जनसंपर्क सेवा अभियानाबद्दल खासदार मोहोळ म्हणाले की, ‘हे अभियान प्रामुख्याने मतदारांशी संवाद साधण्यासाठीचे अभियान आहे. प्रत्यक्ष अभियानावेळी जे करता ते कार्यालयात बसूनही करणे शक्य होते. पण एकाच वेळी संपूर्ण मतदार संघातून नागरिक आले तर प्रत्येकाला फार वेळ देता येत नाही. म्हणून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाऊन तेथे नागरिकांशी संवाद साधण्याला आम्ही प्राधान्य दिले आहे. त्यामुळे नागरिकांची संख्या मर्यादित राहते आणि आलेल्या प्रत्येकाशी बोलताही येते.
‘प्रशासन व नागरिक आमनेसामने असल्याने तक्रारींचा लवकर निपटारा जागीच करता येतो. यातून नागरिकांना मिळणारे समाधान आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींसाठी जास्त महत्वाचे आहे. आमचे लोकप्रतिनिधी भेटतच नाहीत या तक्रारीची संधी देऊ इच्छित नाही. या निमित्ताने कार्यकर्त्याशीही बोलता येते. शासन व प्रशासनाबद्दल नागरिकांच्या भावना समजतात. त्याचा उपयोग पक्षसंघटनेलाही होतो असा अनुभव आहे’, असेही मोहोळ म्हणाले


Recent Comments