Newsworldmarathi Mumbai : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर 82 दिवसानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनाम्याची प्रत मुख्यमंत्र्याकंडे सादर करण्यात येणार आहे. त्यांचे पीए राजीनाम्याची कॉपी घेऊन सागर बंगल्यावर पोहचले आहे. धनंजय मुंडे यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मागील काही महिन्यांपासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. मुंडेचे पीए प्रशांत जोशी हे सातपुडा निवास्थानाच्या बाहेर पडून मुख्यंमत्र्यांच्या सागर बंगल्याकडे रवाना झाले. काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहून घेतला असल्याची माहिती समोर आली होती. अखेर आज त्यांनी आपला राजीनामा दिला आहे. कालच राजीनामा देण्यास सांगितले असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी देखील माध्यमानशी बोलताना दिली होती.


Recent Comments