HomeपुणेBreaking! रविंद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम; शिंदेच्या शिवसेनेत करणार प्रवेश...

Breaking! रविंद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम; शिंदेच्या शिवसेनेत करणार प्रवेश…

Ravindra Dhangekar Pune Press Conference : काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर हे काँगेस सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून चालू होती. अखेर ही चर्चा खरी ठरली आहे. धंगेकर यांनी काही वेळापूर्वी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं की त्यांनी काँग्रेसला आता रामराम केला आहे. त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पत्रकार परिषदेत रवींद्र धंगेकर म्हणाले, “अशा प्रकारचा (पक्ष सोडण्याचा) कोणताही निर्णय हा प्रचंड कठीण असतो.”

माजी आमदार धंगेकर म्हणाले, “मी गेल्या १०-१२ वर्षांपासून या पक्षाबरोबर काम करत आहे. पक्षाबरोबर एक कौटुंबिक नातं तयार झालं आहे. पक्षातील सहकारी हे कुटुंबातील सदस्य बनले आहेत. सर्वांनी माझ्यावर प्रचंड प्रेम केलं. मी गेल्या वर्षी लोकसभा निवडणूक लढवली, विधानसभा निवडणूक लढवली, या काळात पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी माझ्यामागे मोठी ताकद उभी केली. त्यांच्या जोरावरच मी त्या निवडणुका लढवू शकलो. मी निवडणुकीत पराभूत झालो ती वेगळी गोष्ट आहे.

माजी आमदार धंगेकर म्हणाले, “मी शिवसेनेच्या (शिंदे) वाटेवर असल्याच्या बातम्या मधल्या काळात वर्तमानपत्रांनी दिल्या होत्या. त्यानंतर डोक्यावरून बरंच पाणी गेलं. दरम्यान, माझ्या मतदारसंघातील नागरिकांशी चर्चा केल्यानंतर ते म्हणाले, ‘तुम्हाला जनतेची कामं करावी लागतील’. मात्र, सत्ता असल्याशिवाय कामं होत नाहीत. याच काळात मी एकनाथ शिंदे यांना भेटलो होतो. तसेच मी आमदार असताना आणि ते मुख्यमंत्री असताना त्यांनी माझ्या मतदारसंघातील कामं मार्गी लावण्यासाठी सहकार्य केलं होतं. त्यांचा चेहरा जनतेत लोकप्रिय आहे. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या या चोहऱ्याबरोबर जाण्यास काहीच अडचण येणार नाही. त्यामुळे आज संध्याकाळी मी त्यांना भेटणार आहे. त्यानंतर आमचा जो निर्यय होईल तो जाहीर करू.”

Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments