Newsworldmarathi Mumbai : Maharashtra Budget 2025 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वाखालील महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प उद्या (सोमवारी) सादर होईल. अर्थमंत्री अजित पवार तो सादर करतील. याआधी अजित पवार यांनी अर्थमंत्री म्हणून १० वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. यावेळी ते अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर करुन अनोखा विक्रम करतील.
अजित पवारांचा हा अकरावा अर्थसंकल्प ठरणार आहे. पण त्यांच्या पेक्षा जास्त अर्थसंकल्प हे शेषराव वानखेडे यांनी अर्थमंत्री म्हणून मांडले आहेत. त्यांना आतापर्यंत 13 वेळा अर्थसंकल्प मांडले आहे. त्यांच्यानंतर अजित पवारांचा नंबर लागतो. अजित पवारांचा हा 11 वा अर्थसंकल्प असेल. त्यांच्यानंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान जयंत पाटील यांना मिळाला आहे. त्यांनी आतापर्यंत 10 वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. तर सुशीलकुमार शिंदे यांनी तब्बल 9 वेळा अर्थ संकल्प मांडला आहे. वानखेडे यांचे रेकॉर्ड मोडण्याची संधी अजित पवारांकडे आहे.
गेल्यावर्षीही अजित पवार यांनीच अर्थसंकल्प सादर केला होता. अजित पवार हे त्यांच्या आर्थिक शिस्त आणि कडक प्रशासकासाठी ओळखले जातात. गेल्या वर्षीचा निवडणूकपूर्व अर्थसंकल्प हा एक व्यापक, क्रांतिकारी अर्थसंकल्प होता. त्या अर्थसंकल्पातील लोकाभिमुख, लोकप्रिय निर्णयांनी महाआघाडी सरकारला पुन्हा सत्तेत आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.


Recent Comments