Newsworldmarathi Pune: न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेमध्ये वर्षप्रतिपदा गुढीपाडव्या प्रीत्यर्थ शाला समिती अध्यक्ष डॉ.शरद अगरखेडकर, सर्व पदाधिकारी व शालेय मंत्रिमंडळातील विद्यार्थी मंत्रांच्या हस्ते अभिनव गुढी उभारण्यात आली.ज्ञान,श्रम,मूल्य संस्कार,एकी,कर्तृत्व,विज्ञान इत्यादी गुणांची जोपासना नव वर्षात करण्याची ‘संकल्प गुढी’ प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ चारुता प्रभुदेसाई यांच्या कल्पनेतून उभारण्यात आली.
या कार्यक्रमाला चित्रकला शिक्षिका अंजली मालुसरे शुभांगी पाखरे तसेच मुख्याध्यापक चारुता प्रभुदेसाई, उपमुख्याध्यापक जयंत टोले,पर्यवेक्षक अंजली गोरे व मंजुषा शेलूकर यांचे मार्गदर्शन लाभले.


Recent Comments