Homeपुणेपुण्यात १२ एप्रिलला होणार २७ वे विश्वबंधुता साहित्य संमेलन

पुण्यात १२ एप्रिलला होणार २७ वे विश्वबंधुता साहित्य संमेलन

Newsworldmarathi Pune: विश्वबंधुता साहित्य परिषद, रयत शिक्षण संस्थेचे औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आणि काषाय प्रकाशन या संस्थांच्या वतीने २७ व्या विश्वबंधुता साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. संमेलनाच्या निमित्ताने दिला जाणारा ‘विश्वबंधुता दर्पण पुरस्कार’ ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे, रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे आणि विश्वबंधुता मूल्यसंवर्धन समितीच्या सदस्या डॉ. तेजश्री पारंगे यांना प्रदान करण्यात येणार आहे. तिरंगा महावस्त्र, भारताचे संविधान आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती विश्वबंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी दिली.

बंधुताचार्य प्रकाश रोकडे म्हणाले, “ज्येष्ठ विचारवंत प्रा. सुभाष वारे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अश्विनी धोंगडे यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात होईल. प्रसंगी स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, कार्याध्यक्ष डॉ. विजय ताम्हाणे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे प्रा. चंद्रकांत वानखेडे आणि प्रा. शंकर आथरे यांची उपस्थिती राहील.”

दुपारच्या सत्रात ज्येष्ठ कवयित्री सीमा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे ‘जल्लोष अभिजात मराठीचा’ काव्यसंमेलन होईल. यावेळी संगीता झिंजुरके, डॉ. अशोककुमार पगारिया, सीमा झुंजारराव, शिल्पा कुलकर्णी, चंदन तरवडे, मधुश्री ओव्हाळ आणि विनोद सावंत यांची उपस्थिती राहील. २५ कवी यामध्ये सहभागी होतील. त्यानंतर प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. प्रदीप कदम यांचे ‘सुवर्णमहोत्सवी विश्वबंधुता लोकचळवळीची प्रशंसनिय यशोगाथा’ या विषयावर व्याख्यान होईल. डॉ. बंडोपंत कांबळे, डॉ. प्रभंजन चव्हाण, प्रा. प्रशांत रोकडे, डॉ. सविता पाटील, प्रा. भारती जाधव आणि प्रा. सायली गोसावी हे संमेलनाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत, असे रोकडे यांनी नमूद केले.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments