Newsworldmarathi Pune : श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्र व इतर राज्यातून दरवर्षी करोडो भाविक येतात . त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी ,शुद्ध व थंड पिण्याचे पाणी बाराही महिने भाविकांना कायम मिळावे यासाठी रसिकलाल एम धारीवाल फाऊंडेशन द्वारा “प्याऊ -जल प्रकल्प ” लोकार्पण करतांना मला अतिशय आनंद होत आहे , या निमित्ताने रुपये २६. ५० लक्ष निधीचा ,२००० लिटर क्षमतेचा आर ओ प्लांट उभारण्यात आला आहे व मंदिराच्या चारही मजल्यावर सर्वच ठिकाणी थंड व शुद्ध पाणी भाविकांना उपलब्ध होणार आहे आणि आज रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर आई भवानी मातेच्या चरणी हा प्रकल्प सेवाभावाने मी अर्पण करते अशी भावना फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई आर धारीवाल यांनी व्यक्त केली .
आर एम डी फाऊंडेशनद्वारा संपूर्ण भारतभर प्याऊ -शुद्ध व थंड पिण्याचे पाणी विविध ठिकाणी जसे शासकीय रुग्णालये ,शाळा महाविद्यालय , सार्वजनिक उद्यानं , बाजारपेठा तसेच धार्मिक ठिकाणी उपलब्ध करून दिल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली . श्री राणा जगजीत सिंह पाटील आमदार तथा विश्वस्त सदस्य यांनी मंदिरास “प्याऊ जल प्रकल्प “ उभारून आर एम डी फाऊंडेशन द्वारे भाविकांची शुद्ध व थंड पिण्याच्या पाण्याची सोय केली याबाबत देवस्थानच्या व भाविकांच्या वतीने शोभाताई यांचा साडी, श्रीफळ , व भवानी मातेची प्रतिमा देऊन सत्कार केला व आभार मानले . कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी धाराशिव ,तहसीलदार ,कमांडंट श्री तुळजाभवानी सैनिक विद्यालय , देवस्थानाचे जनसंपर्क अधिकारी , प्राचार्य श्री तुळजाभवानी सैनिक विद्यालय, प्रदीप राठी, आकाश राठी अध्यक्ष लातूर अर्बन बँक , चंदकरण लड्डा , आर एम डी फाउंडेशन द्वारा माढा सोलापूर येथे माढा वेल्फेअर फाऊंडेशनच्या माध्यमातून लवकरच लोकार्पण होत असलेले शोभाताई धारीवाल शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे महेश डोके व श्री धनराज शिंदे पदाधिकारी व इतर मान्यवर तथा भाविकगण मोठ्या संख्येने उपस्थित होते .


Recent Comments