Newsworldmarathi Pune : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धाकट्या मुलगा जय पवार यांचा आज, 10 एप्रिल रोजी पुण्यात साखरपुडा सोहळा पार पडणार आहे. हा सोहळा खासगी स्वरूपाचा असून, त्यात पवार कुटुंबातील सदस्यांसोबत काही मोजकेच नातेवाईक आणि पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी सहभागी होणार आहेत. जय पवार यांचं ऋतुजा पाटील यांच्यासोबत लग्न ठरलेलं असून, ऋतुजा या सोशल मीडिया कंपनी चालवणारे प्रवीण पाटील यांच्या मुलगी आहेत.
जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी साखरपुड्यापूर्वी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतल्याने, हे नातं केवळ कुटुंबापुरतंच न राहता, एकप्रकारे राजकीय सौहार्दाचंही प्रतीक बनत आहे.
जय पवार सुरुवातीला राजकारणापासून दूर राहिले असले तरी, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फूटीनंतर त्यांनी सक्रियता वाढवली आहे. त्यांच्या मातोश्री सुनेत्रा पवार यांची लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर, घरच्याच राजकीय भूमिकेमुळे जय पवार यांनाही पुढे यावं लागलं.
सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेले फोटोही पवार कुटुंबाच्या एकत्र येण्याची खूण मानले जात आहेत. विशेषतः अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील राजकीय अंतर लक्षात घेतलं, तर या साखरपुड्याच्या निमित्ताने दोघे एकत्र येत असल्याची बातमी राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरतेय.
कोण आहे ऋतुजा पाटील?
जय पवार यांचा साखरपुडा फलटण येथील प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील यांच्यासोबत ठरला आहे. ऋतुजा या एक सोशल मीडिया कंपनी सांभाळतात आणि उच्चशिक्षित आहेत. त्यांची बहीण प्रसिद्ध केसरी ट्रॅव्हल्सच्या पाटील कुटुंबातल्या घरात सून म्हणून आहेत. जय पवार आणि ऋतुजा पाटील गेल्या काही दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. आता हे नातं अधिकृत होत असून दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत.


Recent Comments