Homeपुणेहिल टॉप-हिल स्लोप व जैवविविधता उद्यानांसाठी नवा नियोजन आराखडा : नगरविकास राज्यमंत्री...

हिल टॉप-हिल स्लोप व जैवविविधता उद्यानांसाठी नवा नियोजन आराखडा : नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या प्रयत्नाना यश

Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिकेच्या विकास आराखड्यामध्ये डोंगरमाथा-डोंगरउतार (हिलटॉप- हिलस्लोप झोन) हा वापर विभाग प्रस्तावित असून जैववैविध्य उद्यान आरक्षण बायो-डायर्व्हसिटी पार्क (बी.डी.पी.) हे आरक्षण प्रस्तावित करण्यात आलेले आहे. तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विकास आराखड्यामध्ये देखील डोंगरमाथा-डोंगरउतार (हिलटॉप- हिलस्लोप झोन) हा वापर विभाग प्रस्तावित करण्यात आलेला आहे. सदर हिल टॉप हिल स्लोप विभागात समाविष्ट असलेल्या जमिनी व बी.डी.पी. आरक्षणातील जमिनी या पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील असून आरक्षणातील जमिनींच्या मालकांकडून उक्त जमिनीवरील वापर विभाग / आरक्षण वगळून सदरहू जमिनी रहिवास विभागात समाविष्ट करण्याच्या अनुषंगाने शासनाकडे अनेक वर्षे पाठपुरावा करण्यात येत होता.

या अत्यंत महत्वाच्या प्रश्नावर माधुरी मिसाळ यांनी नगरविकास राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारताच मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या संदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार स्वतंत्र व्यक्तिगत प्रस्तावांवर निर्णय घेणे ऐवजी एकत्रित सर्वंकष निर्णय घेणेसाठी आणि पर्यावरणाचे संवर्धन व जतन करण्याच्या दृष्टीकोनातून राज्यातील सर्व पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्राच्या वेगवेगळ्या स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली एकत्र करुन एकच पर्यावरण पूरक सर्वसमावेशक विकास नियंत्रण नियमावली तयार करण्याकरिता रमानाथ झा,निवृत्त आय.ए.एस अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली अभ्यासगट गठीत केलेला आहे.

रमाकांत झा यांनी अनेक महानगरपालिकात आयुक्त म्हणून तसेच एमएमआरडीए आयुक्त आणि काही आंतरराष्ट्रीय संस्थामध्ये नगर नियोजनात मोलाची कामगिरी बजावली आहे. सदर अभ्यासगटात त्यांचे सोबत आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे,महानगर आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे,सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, शहर अभियंता, पुणे महानगरपालिका, उपसंचालक, नगर रचना नागरी संशोधन घटक, पुणे यांचा समावेश आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments