Homeक्राईम"तू माझ्याशी लग्न केलं नाहीस तर तुझ्या आई-वडिलांचे मुंडके उडवीन"; युवकाच्या धमकीमुळे...

“तू माझ्याशी लग्न केलं नाहीस तर तुझ्या आई-वडिलांचे मुंडके उडवीन”; युवकाच्या धमकीमुळे विद्यार्थिनीचा टोकाचा निर्णय

Newsworldmarathi Pune : बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गावातील एका तरुणाच्या मानसिक त्रासाला कंटाळून दहावीची परीक्षा दिलेल्या शाळकरी मुलीने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.

संबंधित तरुणाने पीडित मुलीला लग्नासाठी जबरदस्ती करत होतं. त्यास नकार दिल्यानंतर “तू माझ्याशी लग्न केलं नाहीस तर तुझ्या आई-वडिलांचे मुंडके उडवीन” अशी धमकी दिली. या धमकीमुळे भयभीत झालेल्या मुलीने अखेर आपल्या आयुष्याचा अंत करण्याचा निर्णय घेतला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, १५ वर्षीय मयत मुलगी दहावीच्या वर्गात शिकत होती. याच गावातील आरोपी विशाल दत्तात्रय गावडे त्याचे साथीदार प्रवीण नामदेव गावडे, शुभम सतीश गावडे, सुनील हनुमंत खोमणे हा गेल्या अनेक महिन्यांपासून मयत मुलीचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास देत होता.

मेसेज वर धमक्या देत होता. माझ्याशी नाही बोलली तर तुझ्या घरच्यांना खल्लास करून टाकीन अशी धमकी देत होता. चारही आरोपी शस्त्र दाखवून मयत मुलीच्या मनात दहशत निर्माण करत होते. आरोपींकडून वारंवार होणारा पाठलाग आणि दमदाटीला मयत मुलगी कंटाळली होती.

दरम्यान, ७ एप्रिलला तू माझ्याशी गावच्या यात्रेच्या आधी लग्न केले नाहीस तर तुझ्या आई वडिलांना जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याने मयत मुलगी भयभीत झाली होती. आरोपींच्या त्रासाला कंटाळून तिने राहत्या घरी गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून संबंधित तरुणाविरोधात कठोर कारवाई होण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments