Newsworldmarathi Pune : रविवार दिनांक १३ एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी रात्रौ ८ः१५ वा चे सुमारास पुण्येश्वर मंदिर कार्यक्रमासाठी आलेल्या राज्यसभा खासदार डॉ. मेघा कुलकर्णी यांनी या वेळी लगत असलेल्या एैतिहासिक छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्गा येथे नमाजासाठी देण्यात आलेल्या अजान रोखण्यासाठी एैतिहासिक छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्ग्यातील मस्जिदीत घुसुन गोंधळ करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी स्थानिक मुस्लिम नागरिकांना मेधा कुलकर्णी यांच्या कडून धक्काबुक्की करणायात आली. परंतु वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने वाईट प्रसंग घडला नाही.
दरम्यान या सर्व गोंधळापुर्वी त्यांनी एैतिहासिक छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्गा विषयी चिथावणी देणारी विधाने त्यांच्या भाषणातुन केली होती.
यासंदर्भात एैतिहासिक छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्गा ट्रस्ट कडून तातडीने तक्रार देण्यात आली असली तरी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
*शहराची शांसतता धोक्यात आनण्याचा प्रयत्न निंदनीय: राहुल डंबाळे*
हा सर्व प्रकार अत्यंत धक्कादायक तसेच निंदनीय आहे. मुळात हा मुद्दा व परिसर अत्यंत संवेदनशील असून यावर अशा पध्दतीने खासदारांनी व्यक्त होणे चुकूचे आहे. केवळ आपण अधिक कट्टरतावादी असल्याचे दाखविण्याचा व त्याद्वारो वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याचा हा प्रकार असल्याची टिका नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी चे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केली.
हा संपुर्ण प्रकार धार्मिक ध्रुवीकरणाला चालणा देणारा असुन यामुळे शहराची शांतता धोक्यात येत आहे. खासदार ताईंना जे काही आक्षेपार्ह वाटत असेल त्या बाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रार करणे आवश्यक असताना केवळ स्टंट करुन दंगलसदृष्य परिस्थिती निर्माण केले प्रकरणी कुलकर्णी यांचेवर गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई करावी अशी मागणी आम्ही सरकारकडे केली आहे. अशी माहीतीही राहुल डंबाळे यांनी यावेळी दिलीं
Recent Comments