Newsworldmarathi Pune : Sangram Thopate राज्यातील काँग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. संग्राम थोपटे यांनी अखेर काँग्रेसला राजीनामा दिला आहे. शिवाय ते लवकरच भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती पुढे आली आहे. हा पक्ष प्रवेश करण्याच्या आधी थोपटे यांनी उद्या (20 एप्रिल ) काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून या बैठकीत ते पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून ते आपली पुढील घोषणा करणार असल्याची शक्यता आहे. या बैठकीला तालुक्यातील सर्व समर्थक उपस्थित राहणार असल्याची ही चर्चा आहे. संग्राम थोपटे हे काँग्रेसचे बडे नेते असून ते तीन वेळा आमदार होते. तर त्यांचे वडील अनंतराव थोपटे हे सहा वेळा भोर विधानसभेचे आमदार होते. त्यामुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळातील एक बडा नेता भाजपच्या वाटेवर असल्याने राज्यात हा काँग्रेसला मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
मागील काही दिवसांपासून:
थोपटे यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी झालेली भेट आणि त्यांच्या हालचालींनी भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग दिला होता. पुणे जिल्ह्यात काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे, कारण थोपटे घराणं या मतदारसंघात अनेक वर्षांपासून प्रभावी राहिलं आहे.
भाजपच्या गोटात स्वागताची तयारी सुरू:
भाजपकडून त्यांच्या प्रवेशासाठी जोरदार तयारी सुरू आहे आणि थोपटे यांना महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
कारखाना अडचणीत असल्याने भाजप प्रवेश?
संग्राम थोपटे अध्यक्ष असलेला राजगड सहकारी साखर कारखाना हा अडचणीत असल्याची माहिती आहे. या कारखान्याला राज्य सरकारने 80 कोटींचे मार्जिन लोन मंजूर केलं होतं. पण लोकसभेत संग्राम थोपटे यांनी सुप्रिया सुळे यांना मदत केली आणि सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. त्यानंतर अजित पवारांच्या विरोधाने त्यांच्या कारखान्याला जाहीर करण्यात आलेली मदत मागे घेण्यात आली होती.


Recent Comments