Newsworldmarathi Beed : नारळी सप्ताहाच्या समारोपानिमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस गहिनीगडावर आले होते. यावेळी फडणवीस यांच्यासह भाजप नेत्या व मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस आणि नमिता मुंदडा देखील उपस्थित होत्या. वामनभाऊंचा गड दत्तक घ्या, अशी मागणी यावेळी पंकजा मुंडेंनी फडणवीसांकडे केली.
ह.भ.प. संतश्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांनी सुरू केलेल्या नारळी सप्ताह सांगता सोहळ्यास घाटशीळ पारगाव ता. शिरूर कासार जि.बीड येथे मा. मुख्यमंत्री ना. देवेंद्र जी फडणवीस यांची उपस्थित होते.
बीड जिल्ह्याला वारकरी संप्रदाय आणि संताची मोठी परंपरा आहे. ही परंपरा जपण्याचे काम गहिनीनाथ गड प्रामुख्याने करत आहे. महायुती सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र जींच्या माध्यमातून गहिनीनाथ गडावर विविध विकासकामे सुरू आहेत.

अध्यात्माला समाजकारणाची जोड देवून गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी तसेच बीड जिल्ह्याच्या सर्वागीण विकासासाठी मुख्यमंत्री महोदय आपल्यासोबत आहेत, त्यामुळे येत्या काळात बीड जिल्हा नक्कीच सुजलाम, सुफलाम होईल, असा विश्वास यावेळी बोलतांना मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मठाधिपती ह.भ.प विठ्ठल महाराज, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी, आ.मोनिकाताई राजळे, आ.नमिताताई मुंदडा, आ.सुरेश धस, मा.आ.जयदत्त क्षीरसागर, मा.आ.भीमराव धोंडे, मा.आ.बाळासाहेब मुरकुटे, प्रा.लक्ष्मण हाके, घटशीळ पारगाव चे सरपंच नवनाथ खेडकर आणि ग्रामस्थ यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments