Homeबातम्यानागपुरात खळबळ...! अवकाशातून घरावर कोसळला धातूचा तुकडा; नागरिक भयभीत

नागपुरात खळबळ…! अवकाशातून घरावर कोसळला धातूचा तुकडा; नागरिक भयभीत

Newsworldmarathi Nagpur : नागपूरमधील उमरेड येथे एक विचित्र घटना घडली आहे. अमय भास्कर बसेशंकर यांच्या घराच्या छतावर शनिवारी पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास अवकाशातून अज्ञात धातूचा तुकडा कोसळला आहे. या घटनेने मोठा स्फोटाचा आवाज आला आणि आकाशातून हा तुकडा घराच्या गच्चीवर पडला असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे.

हा तुकडा एक मीटरचा असून उल्कापात आहे की उपग्रहाचे तुकडे आहेत, यावरून आता तर्कवितर्क लावले जात आहेत. या तुकड्यामुळे बसेशंकर यांच्या घराच्या स्लॅब आणि भिंतीचे किरकोळ नुकसान झाले आहे. मात्र कुठलीही जीवितहानी झाली नाही.

या घटनेची माहिती सकाळी उमरेड पोलीस ठाण्याला देण्यात आली. पोलिसांनी परिसराची पाहणी केली असता त्यांना एक जाडसर आणि अपूर्ण तुटलेल्या अवस्थेतील लोखंडी धातूचा तुकडा आढळून आला आहे. हा तुकडा नेमका कसा आणि कुठून पडला, याबाबत माहिती मिळू शकली नाही. पोलिसांनी हा रहस्यमय धातूचा तुकडा ताब्यात घेतला असून तो पुढील तपासाचा भाग म्हणून पोलीस ठाण्यात जमा केला आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता व धातूच्या तुकड्याची ओळख पटवण्यासाठी नागपूर येथील फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. उल्कापाताचा भाग तर काहीजण उपग्रहाचे तुकडे असावे, असा अंदाज व्यक्त करीत आहेत. उमरेड पोलीस या घटनेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करीत आहे. तज्ज्ञांच्या निदानानंतर धातूच्या तुकड्याचे सत्य समोर येईल. तोपर्यंत नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे आणि लोक या रहस्यमय धातूच्या तुकड्यामागील सत्य जाणून घेण्यासाठी फॉरेन्सिक अहवालाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments