Homeबातम्याडोंबिवलीच्या मावसभावंडांची काश्मीर सहल ठरली अखेरची

डोंबिवलीच्या मावसभावंडांची काश्मीर सहल ठरली अखेरची

जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 30 जणांचा मृत्यू झाला आहे. यात डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय. मुलाची 10वीची परीक्षा संपली, वर्षभराचा ताण उतरला, रिलॅक्स होण्यासाठी डोंबिवलीतील हेमंत जोशी हे कुटुंबासह फिरायला बाहेर पडले. काश्मीरला जाऊन तेथील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी ते सहलीला गेले, पण तीच ट्रीप त्यांची अखेरची ठरली. पहलगाममध्ये काल दुपारी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात डोंबवलीतील हेमंत जोशी यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासह अतुल मोने, संजय लेले यांचाही बळी गेला. तर पुण्यातील 2 आणि नवी मुंबईतील एकानेही जीव गमावला आहे.

काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील हेमंत जोशी यांचा मृत्यू झाला. हेमंत जोशी हे आपल्या पत्नी व मुलासह फिरण्यासाठी काश्मीरला गेले होते. त्यांचा मुलगा ध्रुव याची दहावीची परीक्षा संपली होती. त्यामुळे त्यांनी काश्मीरला फिरण्याचा प्लान केला होता. मात्र काल दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारत हेमंत जोशी यांचा मृत्यू झालाय. हेमंत जोशी हे डोंबिवली भाग शाळा मैदानासमोरील सावित्री या इमारतीमध्ये राहत होते . त्यांच्या मृत्यूची बातमी समजतात आजूबाजूच्या रहिवाशांमध्ये शेजाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

Oplus_131072

हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा पहलगाममधील हल्ल्यात मृत्यू झाला. संजय लेले शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांचे मेहुणे होते. तिघेजण कुटुंबियांसह काश्मीरात फिरण्यासाठी गेले होते. त्यांची ही सहल मात्र अखेरची ठरली. हे तिघे डोंबिवली पूर्व पश्चिम भागातील नवापाडा, पांडुरंग वाडी आणि नांदिवली या भागातील रहिवासी आहेत. संजय लेले यांच्या मुलाच्या हाताच्या बोटाला गोळी घासून गेली. या हल्ल्यात कुटुंबातील बाकी सदस्य बचावले आहेत.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments