Newsworldmarathi Pune : नागपूर जिल्हा रायफल असोसिएशन(NDRA) यांनी दि:-18/04/2025 ते 20/04/2025 या कालावधीत नागपूर प्रियदर्शनी कॅम्पस येथे महाराष्ट्र एअर गन कॉम्पिटिशन एप्रिल-2025/1 आयोजित केलेले होते सदर स्पर्धेकरिता संपूर्ण महाराष्ट्रातून 250 नेमबाज स्पर्धक हजर होते.

सदर स्पर्धेमध्ये मनस्वी जाधव हिने 10 मी एअर पिस्टल या प्रकारात 352गुण मिळवून *सुवर्णपदक* प्राप्त करून आगामी होणाऱ्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेकरिता पात्र ठरली आहे,कु. मनस्वी ही पुणे शहरामध्ये वानवडी भागातील असून सनग्रेस हायस्कूल मध्ये इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे तसेच प्रशिक्षक- स्नेहा नाळकर यांचे मार्गदर्शनाखाली हेवन पार्क येथील शूटिंग रेंज वर सराव करीत आहे.
मनस्वी चे वडील महेश जाधव हे पुणे पोलीस दलात कार्यरत असून त्यांनीही. नेमबाजी या प्रकारात महाराष्ट्र पोलीस चे प्रतिनिधित्व केले आहे, त्यांचे देखील कु.मनस्वीला प्रोत्साहन व पाठींबा मिळत आहे मनस्वी हिने सुवर्णपदक प्राप्त केल्याने पुणे शहर व वानवडी भागातील मान्यवरांनी पुढील वाटचाली करता शुभेच्छा दिल्या आहेत,


Recent Comments