Newsworldmarathi Team : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले भारतीय नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल यांना दिल्लीत अंतिम श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी हजारोंचा जनसागर लोटला होता. लेफ्टनंट नरवाल यांचा विवाह अवघ्या सात दिवसापूर्वी झाला होता. नववधू असलेल्या त्यांच्या पत्नीने पतीच्या पार्थिवाला अखेरचा निरोप देताना फोडलेला टाहो, उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणणारा ठरला.

नौदल अधिकारी विनय नरवाल यांचा जम्मू काश्मीरच्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांच लग्न सात दिवसांपूर्वी हिमांशीसह झालं होतं. आज त्यांच्या विनय नरवाल यांच्या पार्थिवाचं अखेरचं दर्शन घेताना पत्नी हिमांशीच्या अश्रूंचा बांध फुटला. विनय नरवाल हे पत्नी हिमांशीसह काश्मीरला दोन दिवसांपूर्वी आले होते. १६ एप्रिलला लग्न झाल्यानंतर हे दोघंही मधुचंद्रासाठी आले होते. मधुचंद्राच्या मधुर आठवणी रंगवण्याआधीच दहशतवाद्यांनी विनय नरवाल यांना ठार केलं.
विनय नरवाल यांच्या पार्थिवाचं अखेरचं दर्शन घेताना पत्नी हिमांशीच्या अश्रूंचा बांध फुटला. विनय नरवाल हे पत्नी हिमांशीसह काश्मीरला दोन दिवसांपूर्वी आले होते. १६ एप्रिलला लग्न झाल्यानंतर हे दोघंही मधुचंद्रासाठी आले होते. मधुचंद्राच्या मधुर आठवणी रंगवण्याआधीच दहशतवाद्यांनी विनय नरवाल यांना ठार केलं.


Recent Comments