Homeपुणेदहशतवादी हल्ल्या विरोधात भाजपाची निदर्शने

दहशतवादी हल्ल्या विरोधात भाजपाची निदर्शने

Newsworldmarathi Pune : पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज लोकमान्य टिळक चौकात (अलका टॉकीज) येथे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह दहशतवाद्यांना चोख उत्तर देतील, देशातील जनतेने एकजुटीने त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असे मत भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी व्यक्त केले.

माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, प्रदेशाच्या चिटणीस वर्षा डहाळे पहालगाम येथे मृत्यू मुखी पडलेल्या कै.कौस्तुभ गनबोटे यांच्या भगिनी श्रीमती अर्चना देवधर यांची प्रमुख उपस्थिती होती.

जावडेकर म्हणाले, काश्मीरमधील 370 कलम हटवल्यानंतर, तेथील पर्यटनाला मोठी चालना मिळाली होती. त्यामुळे तेथील अर्थव्यवस्था सुधारत होती. काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला आणि विकासाला खिळ बसावी या उद्देशाने हा भ्याड हल्ला केला. त्याला चोख उत्तर दिले जाईल.

यावेळी पुणे शहरातील भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments