Homeभारतस्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान व आरोग्य शिबिर

स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान व आरोग्य शिबिर

Newaworldmarathi Pune: स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी पुणे येथे भव्य रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे आयोजन स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने करण्यात आले. मागील नऊ वर्षांपासून हा सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असून, यंदाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. विठ्ठल कांगणे सर उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेविका रूपाली पाटील ठोंबरे, प्रा. सुशीलाताई मोराळे, राहुल भाऊ घुले, युवा उद्योजक भरत गित्ते, संतोष उर्फ दिवाकर मते, रुपेश घुले, स्वातीताई पोकळे, शार्दुल जाधवर, दत्ता कोल्हे, सागर कोल्हे, गोकुळ करंजावणे, निलेश पांडे, कुणाल भाऊ पोकळे, समीर दादा जाधवराव, सौरव नाना मते, रोहिणी ताई राहणे, नगरसेवक गोपाळशेठ मळेकर, अविनाश लगड आणि नरसिंह लगड साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.

या शिबिरामध्ये एकूण ७० रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. तसेच सुमारे १२० नागरिकांनी आरोग्य तपासणी करून विविध आजारांबाबत मार्गदर्शन व उपचार घेतले. नागरिकांच्या आरोग्याबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रा. विठ्ठल कांगणे सर यांनी आपल्या भाषणातून स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाच्या शेवटी संतोष मुंडे यांनी सर्व प्रमुख पाहुणे, डॉक्टर, रक्तदाते व उपस्थित नागरिकांचे आभार मानले

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments