Newsworldmarathi Pune : उडान याेजनेच्या माध्यमातून छाेटी व माेठी शहरे एकमेकांशी जाेडली जात अाहे. या याेजनेच्या माध्यमातून दीड काेटी नागरिकांनी मागील दाेन ते अडीचवर्षात प्रवास केला अाहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी याबाबत पुढाकार घेतल्याने विमान प्रवास सर्वसामान्यांचे अावाक्यात अाला अाहे. केंद्राचे अर्थसंकल्पात अर्थमंत्री यांनी उडाण याेजना पुढील दहा वर्ष कायम ठेवणार अाहे. पुढील पाच वर्षात चार काेटी लाेक या याेजनेतून प्रवास करतील. विमानतळावर सर्वसामान्य प्रवाशांना खाद्य पदार्थ महाग मिळतात अशा तक्रारी येत हाेत्या.
त्यानुसार उडाण याेजने प्रमाणे उडाण यात्री कॅफे सुरु करण्यात अाले. कलकत्ता, चेन्नई, अहमदाबाद, याठिकाणी हे कॅफे सुरु झाले असून अाता प्रवाशांना याचा लाभ पुणे विमानतळावर देखील मिळणार अाहे. २० रुपयात काॅफी, सामाेसा, मिठाई , दहा रुपयात चहा, पाणी बाॅटल प्रवाशांना उपलब्ध हाेईल अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ यांनी साेमवारी पत्रकार परिषदेत दिली. लवकरच ही याेजना मुंबई विमानतळावर देखील सुरु हाेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माेहाेळ म्हणाले, देशात दहा वर्षापूर्वी ७४ विमानतळ हाेते ती संख्या अाज १६० पर्यंत वाढलेली अाहे. पूर्वी लाेक एसटी, रेल्वे मागणी करत हाेते अाज विमान मागतात हा बदलत्या भारताचा अाणि विकासाच्या दिशेने वाटचाल करण्याचा संकेत अाहे. २०४७ चा विकसित भारत संकल्प पंतप्रधान यांनी देशासमाेर ठेवला असून यात विमान क्षेत्राचा वाटा माेठा असणार अाहे. ४०० विमानतळे विकसित करण्याचा संकल्प अाहे. पुणे विमानतळ मध्ये माेठा बदल झाला अाहे. पुण्यात दरराेज २०० विमाने ये-जा करत अाहे. ५२ हजार चाैरस मीटर नवीन टर्मनिल झाले असून दरवर्षी ९० लाख लाेक या विमानतळावरुन प्रवास करत अाहे. ३४ चेकिंग काऊंटर निर्माण झाली. २५ डीजी यात्रा सुरु झाले अाहे. जुने टर्मिनल देखील पुर्नविकास हाेणार असून १४ नवीन काऊंटर निर्माण हाेतील त्यामुळे अधिक १० ते १५ लाख प्रवासी प्रवास करु शकतील. १०.६६ टक्के प्रवासी क्षमता वाढ, ६० टक्के प्रवासी वाढ, कार्गे वाहतूक ८.४५ टक्के वाढली असल्याने अामूलाग्र बदल पुणे विमानतळावर दिसून येत अाहे. पुणे- भाेपाळ, त्रिवेंद्रम, चेन्नई, इंदाैर, डेहराडून विमानसेवा नव्याने सुरु झाली अाहे. विमानतळ धावपट्टी विस्तारीकरणबाबत सातत्याने बैठक सुरु अाहे. २०० एकरपेक्षा अधिक जागा ताब्यात घेण्याचे सुत्र ठरले अाहे. विमानतळ विस्तारीकरणसाठी राज्यशासन भूसंपादन करेल. कार्गाेसाठी प्राेत्साहन देण्यात येणार अाहे.
पुणे विमानतळ मेट्राे मार्गशी जाेडणार
खडकवासला ते खराडी हा मेट्राे मार्ग पुणे विमानतळाला जाेडण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक व चर्चा झाल्या अाहे. महा मेट्राे, मनपा यांच्याशी संबंधित विषय असून मनपा अाणि मेट्राे याबाबत डीपीअार करण्यासाठी प्रयत्न करेल. पुण्यातील चार मेट्राे मार्ग निगडी ते स्वारगेट, हिंजवडी ते शिवाजीनगर, वनाज ते रामवाडी ,खडकवासला ते खराडी हे सर्व मेट्राे मार्ग विमानतळाशी मेट्राेने थेट जाेडण्याचे नियाेजन सुरु अाहे. पुणे शहराची लाेकसंख्या ६० लाख तर जिल्हामिळून एक काेटीपेक्षा अधिक अाहे. त्यामुळे पुढील ५० वर्षाचा विचार करता अधिकाधिक सेवा देण्याचा प्रयत्न राहिली असे माेहाेळ यांनी सांगितले.
Recent Comments