Advertisements
चंपाषष्ठी हा खंडोबा देवाचा विशेष उत्सव असून, या दिवशी खंडोबाची पारंपरिक पूजा, अभिषेक, महाप्रसाद, आणि विविध धार्मिक कार्यक्रम गडावर आयोजित केले जातात. जेजुरी गडावरची परंपरा, पिवळ्या हळदीच्या उधळणीसह साजरी होणारी हा उत्सवाची वैशिष्ट्ये भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात.
गडावरचा उत्सव फक्त धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा मानला जातो. जेजुरी गडावर सध्या भक्तांनी गर्दी केली असून, भक्तांच्या सोयीसाठी प्रशासनानेही विशेष व्यवस्था केली आहे.