Newsworldmarathi Beed : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना अश्लील संदेश पाठवून आणि त्रासदायक कॉल करून हैराण करणाऱ्या एका व्यक्तीला महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अमोल काळे (वय २५) असे असून, त्याला पुण्यातील भोसरी परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. सायबर पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
या प्रकरणी मुंबईतील नरिमन पॉइंट येथील महाराष्ट्र भाजप कार्यालयात सोशल मीडिया समन्वयक निखिल भामरे (26) यांनी तक्रार दाखल केली होती. आरोपी काळे हा गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे यांना कॉल आणि मेसेज द्वारे त्रास देत होता. अखेर भामरे यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 78 आणि 79 अंतर्गत माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित तरतुदींसह एफआयआर नोंदवला.
आरोपी काळेचे मोबाईलचे लोकेशन शोधून काढले. ते पुण्यातील असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर सायबर पोलिसांनी पुण्यातील भोसरी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने काळेला ताब्यात घेतले. पोलि १०। खाक्या दाखविताच आरोपी अमोल काळे याने आपणच मुंडे यांना अश्लील मॅसेज व कॉल करत असल्याचे कबूल केले. यानंतर त्याला अटक केली आणि मुंबईला आणण्यात आले.
अमोल काळे हा विद्यार्थी असून तो बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील रहिवाशी असल्याचे समजते. त्याने अश्लील भाषा का वापरली, तसेच छळ करण्याच्या वर्तनामागील त्याचा हेतू काय याचा तपास सध्या करण्यात येत आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.


Recent Comments