Newsworldmarathi Bhavaninagar: श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्यात अखेर समन्वय साधला गेला असून सर्वपक्षीय ‘श्री जय भवानी माता’ पॅनल जाहीर करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून या पॅनलच्या जागा वाटपावरून राजकीय हालचालींना वेग आला होता. गुरुवारी पवार, भरणे आणि जाचक यांच्यात झालेल्या बैठकीनंतर सर्व जागांवर एकमत झाले.
या पॅनलमधून लासुर्णे (गट क्र. 1) मधून पृथ्वीराज जाचक व शरद जामदार, सणसर (गट क्र. 2) मधून रामचंद्र व शिवाजी निंबाळकर, उद्धट (गट क्र. 3) मधून घोलप पृथ्वीराज व कदम गणपत, अंथुर्णे (गट क्र. 4) मधून शिंगाडे विठ्ठल, दराडे प्रशांत, नरुटे अजित यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
सोनगाव (गट क्र. 5) मधून काटे अनिल, कोळेकर बाळासाहेब व मासाळ संतोष, गुणवडी (गट क्र. 6) मधून गावडे कैलास, देवकाते सतीश व टिळेकर निलेश यांची नावे निश्चित झाली आहेत. ब वर्गातून अशोक पाटील, अनुसूचित जाती-जमातीमधून मंथन कांबळे, महिला राखीवमधून सौ. माधुरी राजपुरे व सौ. सुचिता सपकळ, ओबीसीमधून तानाजी शिंदे आणि भटक्या विमुक्त जाती-जमाती विशेष प्रवर्गातून डॉ. योगेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.


Recent Comments