Newsworldmarathi Pune : गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. लग्नसराईच्या काळात सोन्याच्या किमतीत सतत होणारी वाढ ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत होती. त्याचप्रमाणे शुक्रवारी (२ मे) सोन्याच्या किमतीत थोडीशी घसरण झाली आहे. चांदीच्या किमतीतही बदल झाला आहे.
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, शुक्रवारी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ९३,०३० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा भाव ८५,२७८ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा भाव ९५,२९० रुपये आहे. तसेच, १० ग्रॅम चांदीचा भाव ९५३ रुपये आहे.
दरम्यान, हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे, हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते. सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे. १ एप्रिल २०२३ पासून केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.
आजचा सोन्याचा भाव काय?
मुंबई :
२२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ८५,१२२
२४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९२,८६०
पुणे :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८५,१२२
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९२,८६०
नागपूर :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८५,१२२
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९२,८६०
नाशिक :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८५,१२२
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९२,८६०


Recent Comments