Newsworldmarathi Dound : दहिटणे (ता. दौंड) येथील भिसे वस्तीवर बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास अकरा महिन्याच्या बाळाला बिबट्याने उचलून नेल्याची धक्कादायक घटना घडली. अन्वनित धुळा भिसे असे त्या चिमुकल्याचे नाव असून, तो आईसमोर खेळत असताना बिबट्याने अचानक झडप घालून त्याला ओढून नेले. आईच्या आरडाओरडीनंतर बिबट्या पळून गेला. या घटनेमुळे गावात मोठा संताप पसरला आहे.
दौंड तालुक्याच्या पश्चिम भागात बिबट्याचे सतत दर्शन होत असून पूर्वीही पाळीव जनावरांवर हल्ले झाले आहेत. परिसरात पिंजरा लावण्याची मागणी वारंवार करण्यात आली होती, मात्र वनविभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. घटनेनंतर यवत पोलीस व वनविभागाने शोधमोहीम सुरू केली असून श्वानपथकाची मदत घेण्यात आली आहे. अद्याप बाळाचा ठावठिकाणा लागलेला नाही. वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
Recent Comments