Homeपुणेसलग सुट्ट्यांमुळे महामार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी

सलग सुट्ट्यांमुळे महामार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी

Newsworldmarathi pune मे महिन्याच्या सुरुवातीला सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे, नाशिक आणि गोवा महामार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. उष्णतेपासून बचावासाठी अनेक प्रवासी रात्री प्रवास करत असल्याने रात्रीही महामार्गांवर मोठ्या वाहनांच्या रांगा दिसून आल्या. विशेषतः मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील लोणावळा-खंडाळा घाटात ८ ते १० किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घाट पार करण्यासाठी लागणारा वेळ १५-२० मिनिटांवरून २-३ तासांपर्यंत वाढला होता.

खासगी बसचालक राजेंद्र सिंह यांनी मुंबई-पुणे मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. रेल्वे प्रशासनाने उन्हाळी गर्दी लक्षात घेऊन विशेष गाड्यांची घोषणा केली असली, तरी सर्व गाड्यांचे आरक्षण भरले असून तत्काळ तिकीटही मिळत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. अनधिकृत दलालांकडून जादा दराने तिकीट विक्री होत असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत.

मुंबई-नाशिक मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांमुळे दिवा, कल्याण फाटा आणि माणकोली येथे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून वाहनचालकांचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिक वेळ रस्त्यावर काढावा लागत आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments