Newsworldmarathi Pune : राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधातील खंडणी व बदनामी प्रकरणात आता मोठा राजकीय वळण आले आहे. तपासाच्या धागेदोऱ्या माजी विधान परिषद सभापती आणि शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्यापर्यंत पोहोचले असून, वडूज पोलिसांनी त्यांना समन्स बजावले आहेत. त्यांना शनिवारी सकाळी ११ वाजता हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घडामोडींमुळे सातारा जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
प्रकरणाचा उगम एका महिलेच्या आरोपांपासून झाला असून, तिच्या म्हणण्यानुसार जयकुमार गोरे यांनी २०१६ पासून व्यक्तिगत आकस ठेवून त्रास दिला, तसेच अश्लील फोटो व्हॉट्सॲपवर पाठवले. याप्रकरणी तिने पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, या प्रकरणात पत्रकार तुषार खरात, संबंधित महिला आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते अनिल सुभेदार यांना दहिवडी पोलिसांनी अटक केली होती. तिघांनाही न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
आता रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव तपासात पुढे आल्यामुळे हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे बनले आहे.राजकीय वर्तुळात हे पाऊल रामराजेंना मोठा धक्का मानले जात आहे. पुढील तपासात आणखी कोणती नावे पुढे येतात, याकडे राज्याचे राजकारण लक्ष ठेवून आहे.


Recent Comments