Newsworldmarathi Pune : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सुरुवातीला हे निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागतील, अशी अपेक्षा होती. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार, बारावीचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शेवटच्या टप्प्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.
राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहावी आणि बारावीचे निकाल १५ मेपर्यंत नक्की जाहीर करण्यात येणार आहेत. यंदा लेखी परीक्षा दरवर्षीपेक्षा दहा दिवस लवकर घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे निकालही लवकर लागणार असून, विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रम आणि करिअरच्या योजना करण्यासाठी अधिक वेळ मिळेल.
बारावीच्या परीक्षा ११ फेब्रुवारीपासून, तर दहावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू झाल्या होत्या. सध्या सर्व विभागीय मंडळांचे निकाल एकत्र करून त्याचा अंतिम आढावा घेतला जात आहे. बारावीचा निकाल ५ मे ते १० मेदरम्यान, तर दहावीचा निकाल १५ मेपर्यंत लागेल, असे सांगण्यात आले आहे


Recent Comments