Newsworldmarathi Pune: पुणे शहरात पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना समोर आली आहे. पुण्यातील नवले ब्रिज जवळ ‘हिट अँड रन’ची घटना घडली आहे. नवले ब्रिज जवळ एका मर्सिडीज कारने दुचाकीस्वाराला उडवले आहे. या घटनेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. कुणाल हुशार (रा. चिंचवड) असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
कारमधील मद्यधुंद चालकासह चार लोकांची अद्यापही मेडिकल झालेली नाही. आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेने पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेचा पोलीस तपस करत आहेत.
वाघोलीत डंपरने महिलेला फरफटत नेलं, जागीच मृत्यू
वाघोलीत डंपरने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली, तर तिचा पती किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी सहा वाहण्याच्या सुमारास बायफ रोडवरील आयडीबीआय बँकेसमोर घडली आहे.
रुपाली सुरज तिवारी ( वय- २७ वर्षे, रा. पार्थ व्हीलाज, बायफ रोड ) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. तिचे पती सूरज हे किरकोळ जखमी झाले. या प्रकरणी डंपर चालक शुभम सुदाम मस्के (वय- २५ वर्षे, रा. लोणीकंद ) व डंपर मालक प्रमोद संभाजी भाडळे ( रा. वाघोली ) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments