Homeमुंबईभिसे यांच्या जुळ्या बाळांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २४ लाखांची मदत

भिसे यांच्या जुळ्या बाळांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २४ लाखांची मदत

Newsworldmarathi Mumbai: पुण्यात प्रसूतीदरम्यान ईश्वरी भिसे यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांनी जुळ्या बाळांना जन्म दिला, मात्र दोन्ही नवजात बाळांचे वजन अत्यल्प असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करून विशेष निगा राखण्यात येत आहे. या बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत देण्यात आली आहे. सदर मदत ही रुग्णालयाने दिलेल्या अंदाजपत्रकानुसार देण्यात आली आहे. यापुढे देखील पुढील उपचारांसाठी आणखी आवश्यकता भासल्यास त्याचा लागणारा संपूर्ण खर्चही कक्षातूनच केला जाणार असल्याचे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.

Advertisements

ईश्वरी भिसेंच्या निधनाच्या वृत्तानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिसे कुटुंबीयांची तात्काळ भेट घेऊन भावनिक आधार दिला होता. यावेळी त्यांनी दिलेले मदतीचे आश्वासन प्रत्यक्षात उतरवत, आज संबंधित रुग्णालयात मदतीची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. उपचाराकरिता एका बाळासाठी १० लाख, तर दुसऱ्या बाळासाठी १४ लाख रुपये मदत म्हणून दिली गेली आहे. सध्या दोन्ही बाळांचे उपचार सूर्या हॉस्पिटल, पुणे येथे सुरू असून त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे नाईक यांनी सांगितले.

Advertisements
Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments