Homeपुणेकचऱ्यातून निर्माण केलं निसर्गाचं सौंदर्य; साई जनसेवा प्रतिष्ठान आणि PMCचा अनोखा उपक्रम

कचऱ्यातून निर्माण केलं निसर्गाचं सौंदर्य; साई जनसेवा प्रतिष्ठान आणि PMCचा अनोखा उपक्रम

पुणे : पुणे शहरामध्ये वाढत्या शहरीकरणाबरोबरच लोकसंख्येचा विचार केला तर सध्या असलेली उद्यानांची संख्या अगदीच अपुरी आहे. मात्र योग्य नियोजनातून आपल्याच घराच्या, ऑफिसच्या टेरेसवर घरातील टाकाऊ वस्तू आणि ओल्या कचऱ्यापासून सुंदर आणि हिरवेगार टेरेस गार्डन आपण स्वत: तयार करू शकतो याचा आदर्श घालून देत पुणे महानगरपालिका, कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय आणि साई जनसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या ८०० चौ. फुट टेरेसवर मनमोहक टेरेस गार्डन तयार करण्यात आले आहे. याचे उद्घाटन नुकतेच अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी पी आणि उपायुक्त, परिमंडळ क्रमांक ४ जयंत भोसेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

पुणे महानगरपालिका, कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या टेरेसवर या पर्यावरणपूरक गार्डनची निर्मिती करण्यात आली असून या गार्डनमध्ये टाकाऊ टायर, ड्रम आणि विटांचा उपयोग करून ८०० चौरस फूट जागेत फळे, फुले, भाज्या आणि शोभेच्या झाडांनी ही बाग फुलवण्यात आली आहे. या टेरेस गार्डनमध्ये शेवगा, कारले, संत्रा, पपई, कांचन, बहावा, चाफा, जास्वंद, सदाफुली, कर्दळी, तगर, गुलाब, बांबू, ऊस, शोभेची रोपे अशी फळझाडे, फुलझाडे आल्याने ही बाग अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसत आहे. यासोबतच उन्हाची दाहकता लक्षात घेवून पक्षासाठी केलेली पिण्याचे पाणी व्यवस्था तसेच परिसरात केलेली नागरिकांसाठीची बैठक व्यवस्था सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

यावेळी बोलताना अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी पी म्हणाले कि, “ पुणे महानगरपालिका ही संस्था नागरिकांशी निगडीत असून तिचे ब्रिदवाक्य वरं जनहितं ध्येयम असे आहे. आपण केलेल्या कामाचा प्रभाव हा नागरिकांवर होत असतो व नागरिकांकडून आपल्या सेवेबाबत मिळणारे समाधान आणि कौतुक हे आपल्या कामाची पोचपावती असते आणि हि पोचपावती कोंढवा येवलेवाडी कार्यालयास मिळाली आहे” याप्रसंगी कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त लक्ष्मण कादबाने यांचेसह सहाय्यक आयुक्त दिपक राऊत, जगले, मंदार वेदक, अपेक्स कमिटी मेंबर, नेराळे मॅडम, तंवर मॅडम, मोहल्ला कमिटी सदस्य, धायभर तसेच उपअभियंता चौधरी मॅडम , प्रशासन अधिकारी मोरे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक दुल्लम व कदम व कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी व साई जनसेवा प्रतिष्ठानचे सुरज लोखंडे यांचेसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments