Homeपुणेमहिला, बालकांची सुरक्षा व आरोग्यासाठी गेस्टॅम्प ऑटोमोटिव्ह्स आणि होप फाउंडेशन कडून...

महिला, बालकांची सुरक्षा व आरोग्यासाठी गेस्टॅम्प ऑटोमोटिव्ह्स आणि होप फाउंडेशन कडून गाड्यांचे वाटप

Newsworldmarathi Pune : चाकण एमआयडीसीमध्ये स्थापित असलेल्या सुप्रसिद्ध अशा गेस्टॅम्प आॅटोमोटिव्ह्ज इंडिया कंपनी आणि होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन च्या वतीने आपली समाजिक जबाबदारी लक्षात घेऊन महिला व बालकांची सुरक्षा आणि त्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी आरोग्य विभाग ,पुणे, ग्रामीण पोलीस आयुक्तालय कार्यालय व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय सरकारी विभागांसाठी ५ स्कोडा कायलॅक गाड्यांचे वाटप यावेळी फीत कापून तसेच हिरवा झेंडा दाखवून या गाड्या संबंधित विभागांकडे रवाना करण्यात आल्या.

या कारवाटप कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून गेस्टॅम्पच्या आशिया विभागाचे सीईओ अँटोनियो लोपेझ उपस्थित होते. याशिवाय जिल्हा रुग्णालय, औंधचे सिव्हिल सर्जन डॉ. नागनाथ एस. यम्पल्ले, डॉ. अमित लवेकर , मानसोपचार तज्ज्ञ, सहायक सिव्हिल सर्जन, जिल्हा रुग्णालय, औंध. गेस्टॅम्प आॅटोमोटिव्ह्जचे कंट्री सीईओ आणि अध्यक्ष ग्लिन जोन्स, कंट्री सीएफओ व प्रादेशिक वित्त संचालक अजय चौधरी, होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशनच्या सीईओ डॉ. कॅरोलिन ओडीअर दि वॉल्टर, भरोसा सेलच्या पोलिस उपनिरीक्षक अनुराधा पाटील आणि पोलीस निरीक्षक प्रवीण कांबळे म्हाळुंगे पोलीस स्टेशन यांच्यासह कंपनीचे इतर अधिकारी, तसेच पोलिस व आरोग्य खात्यातील अधिकारी उपस्थित होते.

गेस्टॅम्प ऑटोमोटिव्ह्सचे आशिया विभागाचे सीईओ अँटोनियो लोपेझ म्हणाले, “गेस्टॅम्पमध्ये आम्ही असा विश्वास ठेवतो की शाश्वत विकासाची सुरुवात समुदायांच्या सक्षमीकरणातून होते. होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशनसोबतच्या या भागीदारीद्वारे आम्ही केवळ वाहनेच देत नाही, तर प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सन्मानासाठी गुंतवणूक करत आहोत.”

या उपक्रमामुळे मोबिलिटी, आऊटरिच व आपत्कालीन प्रतिसाद क्षमतेत वाढ होऊन, विशेषतः महिलांचे व बालकांचे आरोग्य व सुरक्षितता सुनिश्चित करण्यात मदत होईल आणि अधिक सुरक्षित, निरोगी समुदाय घडवता येईल.

डॉ. कॅरोलिन ओडीअर दि वॉल्टर, सीईओ, होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन यांनी सांगितले,”हा उपक्रम हे सुनिश्चित करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे की आरोग्य व संरक्षण सेवा गरजूंना सहज उपलब्ध होतील. गेस्टॅम्पसोबत मिळून आम्ही मजबूत व सुरक्षित समुदाय घडवण्याचा प्रयत्न करत आहोत, जिथे प्रत्येक मूल व प्रत्येक महिला सन्मानाने व आशेने जगू शकेल.”

गेस्टॅम्प ऑटोमोटिव्ह्स इंडिया आणि होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २०२५–२६ या वर्षासाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा अजेंडा अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आला आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश महिला आणि बालकांच्या आरोग्य व संरक्षण क्षेत्रात क्षमता निर्माण करून एक सशक्त समुदाय घडवण्याचा आहे.

समाज कल्याणासाठी आणि सातत्यपूर्ण वचनबद्धतेचा भाग म्हणून गेस्टॅम्प ऑटोमोटिव्ह्स आणि होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन यांच्या वतीने पाच स्कोडा कायलॅक कार महत्त्वाच्या शासकीय संस्थांना देणगी म्हणून प्रदान केली गेली. यामध्ये पोलिस यंत्रणा व आरोग्य यंत्रणांचा समावेश आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments