Newsworldmarathi Pune: शहरातील नवले ब्रिजवर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. आज पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली असून, ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने तीन वाहनांना जोरदार धडक बसली. या अपघातात तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, एक व्यक्तीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अपघात इतका भीषण होता की वाहनांचे पुढचे भाग चकनाचूर झाले. घटनास्थळी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले. सध्या अपघातग्रस्त वाहनं बाजूला करण्याचे काम सुरू असून, अधिक तपास सुरू आहे.
नवले ब्रिजवर याआधीही अनेक वेळा अशा प्रकारचे अपघात घडले आहेत. वाहनांची गती, वाहतूक नियमनाची कमतरता आणि उताराचा रस्ता हे सर्व घटक वारंवार होणाऱ्या दुर्घटनांना कारणीभूत ठरत आहेत. स्थानिक नागरिकांनी या समस्येकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहावे, अशी मागणी पुन्हा एकदा केली आहे.


Recent Comments