Newsworldmarathi Parali : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात बोलताना आपल्या शाकाहारी जीवनशैलीविषयी आणि सध्याच्या सामाजिक परिस्थितीबाबत खंत व्यक्त केली. “मी शाकाहारी आहे, मला खात मिळालं मांसाहारी. मी जेवायला गेल्यावर मांसाहारीचं जेवण समोर येतं. कुठेही गेले तरी लोक म्हणतात – कोंबडे खा, मासे खा,” असं स्पष्टपणे सांगत त्यांनी या गोष्टीची आठवण करून दिली.
पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये हास्याची लाट तर निर्माण झालीच, पण त्यांनी सामाजिक बदलाची सूचक टीकाही केली. त्या म्हणाल्या की, “माझ्यासारख्या शाकाहारी व्यक्तींना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक ठिकाणी शाकाहारी पर्याय उपलब्ध नसतात.” त्यांच्या या वक्तव्यातून शाकाहारी व्यक्तींविषयी असलेली अनास्था अधोरेखित झाली.
पशूसंवर्धन विभाग आणि राष्ट्रीय पशूधन अभियानातंर्गत पशूपालकांसाठी आयोजित एकदिवसीय कार्यशाळेचे उदघाटन करून मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी पशूपालक आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.
पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून तरुणांना स्वावलंबी बनवणाऱ्या योजना आम्ही राबवित आहोत. दुग्ध व्यवसाय वाढवण्यासाठी देखील प्रयत्न सुरु आहेत. ग्रामीण भागातील तरुणांना पशूपालनाशी निगडित प्रकल्प आणि उद्योगांच्या माध्यमातून ‘ग्रामीण उद्योजक’ बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. असेही मुंडे म्हणाल्या.
पशूसंवर्धन विभागातंर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांना शेतीचा दर्जा देण्यासाठी देखील प्रयत्न सुरु आहेत. तरुणांनी पशूपालनाच्या अनेक योजनांमध्ये सहभागी होऊन योजनांचा लाभ घ्यावा. इतर उद्योगांप्रमाणेच पशूपालनातून मोठा फायदा मिळतो. तुमचे हात मजबूत करण्यासाठी शासन या योजना राबवत आहे, योजनांचा लाभ घ्या आणि इतरांनाही योजनांची माहिती दया’ असे आवाहन मुंडे यांनी उपस्थित पशूपालकांना केले.


Recent Comments