Homeबातम्या'चलो मुंबई'ची घोषणा करताच सरकारकडून कारस्थाने सुरू; मनोज जरांगेंचा आरोप

‘चलो मुंबई’ची घोषणा करताच सरकारकडून कारस्थाने सुरू; मनोज जरांगेंचा आरोप

Newsworldmarathi sambhajinagar : मराठा आरक्षणासाठी चलो मुंबई अशी घोषणा करत, मुंबईत जावून आंदोलन करण्याचे जाहीर केल्यानंतर सरकारकडून मला बदनाम करण्याचे कट-कारस्थान सुरू झाले आहे. माझे खोटे व्हिडीओ बनवण्याचा कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.

प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी त्यांना शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यावेळी रुग्णालयात त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, यापूर्वीही माझे खोटे व्हिडिओ तयार करण्यात आले होते. तसाच प्रकार आताही सुरू केला आहे.

तसेच आरक्षण मिळावे, समाजातील लेकरांचा फायदा व्हावा, यासाठी २९ ऑगस्टला आम्ही मुंबईला जाणार आहोत. या आंदोलनात सर्वांनी सहभागी होवून आपली ताकद दाखवावी. यावेळी मागच्या पेक्षा चार पट जास्त मराठे मुंबईत येतील, असा विश्वासही मनोज जरांगे यांनी व्यक्त केला.

राज्यात आदिवासी समाजाची संख्या कमी असली तरी, त्यांच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. ओबीसीमध्ये साडेतिनशे जाती आहेत, पण एकच माणूस पुढे जातो. निवडणुकीपुरते आदिवासी, ओबीसींचा उल्लेख होतो, त्यामुळे लोकांनी भावनिक होऊ नये, असे आवाहानही मनोज जरांगे यांनी केले.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments