Newsworldmarathi Paranda: महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या जिल्हाध्यक्षांच्या शेतात आग लावल्याने घरासह चिकूची बाग, ठिबक संच, केबल जळून भस्मसात झाले. ही दुर्घटना परंडा तालुक्यातील करंजा शिवारात रविवारी घडली आहे. या घटनेत शेतकऱ्याचे ४ लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुदीप मोरे यांची करंजा शिवारात शेती आहे. अज्ञात व्यक्तीने रविवारी सकाळी त्यांच्या शेतातील घरासह आंबा व चिक्कूच्या बागेला आग लावली.
उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले. आगीत बीएसएनएलचे केबल, चार एकरसाठी आणलेले ठिबक सिंचनचे पाईप तसेच शेतातील घर, इतर साहित्य, आंबा व चिक्कू बाग जळून खाक झाली. शेजारचे शेतकरी व लोकांनी आग आटोक्यात आणली. तोपर्यंत मोरे यांचे जवळपास ४ लाख रुपयाचे नुकसान झाले.
याबाबत अॅड. पवन मोरे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. प्रशासनाने घटनास्थळाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी मोरे यांनी केली आहे.


Recent Comments