Newsworldmarathi Pune : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आपला पती गमावलेल्या प्रगती जगदाळे यांनी भारतीय सेनेच्या ‘मिशन सिंदूर’ या कारवाईवर प्रतिक्रिया देताना भावना व्यक्त केल्या. “मिशन सिंदूर” हे नाव अतिशय योग्य असून, हे वाचून डोळ्यात पाणी आलं, असं त्यांनी सांगितलं.
पहलगम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात प्रगती जगदाळे यांचे पती संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला होता. “दहशतवाद्यांनी माझं सिंदूर पुसलं होतं. आज भारतीय सेनेनं त्या प्रत्येक बहिणीच्या वेदनेचा बदला घेतला आहे. या मोहिमेला ‘सिंदूर’ हे नाव दिलं गेलं, हे आमच्यासाठी फार मोठं आहे,” असं प्रगती जगदाळे म्हणाल्या.
त्यांनी पुढे सांगितलं, “हे नाव केवळ एका मोहिमेचं नाही, तर प्रत्येक आई-वडिलांच्या दु:खाचं आणि शौर्याचं प्रतीक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमच्या वेदनेची जाणीव आहे, याचा विश्वास वाटतो.”
भारतीय सेनेच्या कारवाईबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करताना म्हटलं की, “हे फक्त टार्गेट्स नष्ट करणं नाही, तर प्रत्येक शहीदासाठी उगवलेलं नवसंजीवन आहे. ‘मिशन सिंदूर’ हा फक्त हल्ला नाही, तर आमच्या अश्रूंना मिळालेली किंमत आहे.”
ऑपरेशन सिंदूरचा भाग म्हणून भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर बॉम्ब टाकले आहेत, ज्यामुळे संपूर्ण पाकिस्तान हादरला आहे. ऑपरेशन सिंदूर हे भारतीय हवाई दल आणि लष्कराचे ऑपरेशन होते. एकीकडे, आयएएफच्या लढाऊ विमानांनी हवाई हल्ले केले, तर दुसरीकडे, लष्कराने क्षेपणास्त्रांचा वापर देखील केला. भारतीय सैन्याच्या हल्ल्यांची ताकद इतकी प्रचंड होती की पाकिस्तानी हवाई दलाला भारतीय हवाई दलाने क्षेपणास्त्रे डागल्याचे लक्षातही आले नाही.
Recent Comments