Homeबातम्याऑपरेशन सिंदूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ॲापरेशन मॅानिटर करत होते

ऑपरेशन सिंदूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ॲापरेशन मॅानिटर करत होते

Newsworldmarathi Delhi: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत, भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. लष्कर, नौदल आणि हवाई दलाने संयुक्तपणे पाकिस्तानातील विविध ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ला केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला भारताच्या हद्दीत राहून करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात हा हवाई हल्ला पाकिस्तानच्या सुमारे 100 किमी आत केला गेला.

या ऑपरेशनदरम्यान एकूण 9 टार्गेट्स निश्चित करण्यात आले होते आणि सर्व 9 च्या 9 टार्गेट्स यशस्वीरित्या उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. या टप्प्याटप्प्याने पार पडलेल्या हल्ल्यामुळे दहशतवाद्यांना मोठा फटका बसला असून, अनेक दहशतवादी छावण्या नष्ट झाल्याची माहिती समोर आली आहे.

या महत्त्वाच्या कारवाईदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः संपूर्ण ऑपरेशनवर नजर ठेवून होते. त्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले. भारताच्या तिन्ही सैन्य दलांच्या संयुक्त कारवाईत उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून अत्यंत नियोजनबद्ध आणि अचूक हल्ला करण्यात आला.

या हल्ल्यामुळे भारताने पुन्हा एकदा आपली दहशतवादविरोधी ठाम भूमिका स्पष्ट केली आहे. ही कारवाई केवळ प्रतिशोध नव्हे, तर भविष्यातील अशा घटनांना आळा घालण्यासाठीचा इशाराही मानला जात आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments