Newsworldmarathi Parali: शहरातून एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. कोयत्याने सपासप वार करत गर्लफ्रेंडची हत्या केली, त्यानंतर रक्ताने माखलेल्या अंगाने प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना सुधारगड तालुक्यातील परळी येथील एका खासगी नर्सिंग होममध्ये मंगळवारी रात्री घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शेखर दुधाणे व पौर्णिमा अशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियकर शेखर दुधाणे आणि त्याची प्रेयसी पौर्णिमा यांच्यातील प्रेमसंबंध गावात सर्वश्रुत होते.परळी येथील एका खासगी नर्सिंग होममध्ये पौर्णिमा ही नर्स म्हणून कार्यरत होती. नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री शेखर नर्सिंग होममध्ये पोहोचला. त्याने पौर्णिमावर कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून केला. त्यानंतर त्याने रक्ताने माखलेल्या अंगाने तिथेच गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी हि घटना उघडकीस आली आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पंचनामा
करून पोलिसांनी चौकशीला सुरूवात केली आहे. पोलिसांकडून कोयता आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. शेखर याने प्रियसीची हत्या का केली? त्याने स्वतःचे जीवन संपवण्याचे टोकाचे पाऊल का उचलले? या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. या घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.
Recent Comments