Homeपुणेसंगीत ऐकल्यावर एक नवचैतन्य निर्माण होते; कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची भावना

संगीत ऐकल्यावर एक नवचैतन्य निर्माण होते; कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची भावना

Newsworldmarathi Pune: संगीत म्हणजे आनंदाचा एक मेळा.कोणतेही संगीत ऐकल्यावर लगेच आपल्या मनावर त्याचा परिणाम होतो. एक नवचैतन्य निर्माण होते. गाण्याचा छंद जोपासून अनेक पुणेकरांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये आपला ठसा उमटविला आहे. पुणेकरांच्या गायनाच्या छंदाला गेली 23 वर्ष सोमेश्वर फाऊंडेशन मार्फत सनी निम्हण प्रेरणा देत आहेत. याबद्दल समाधान आहे, अशी भावना राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केली.

कार्यसम्राट आमदार स्व. विनायक निम्हण यांनी गायक कलाकारांना दिलेले मानाचे व्यासपीठ म्हणजे सोमेश्वर फाऊंडेशन आयोजित पुणे आयडॉल स्पर्धा. या स्पर्धेची महाअंतिम फेरी आज बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे संपन्न झाली.यावेळी कृषिमंत्री कोकाटे बोलत होते. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे पुणे शहाराध्यक्ष धीरज घाटे, संयोजक सनी विनायक निम्हण आदि मान्यवर उपस्थित होते. पुणे आयडॉल स्पर्धेच्या निमित्ताने दरवर्षी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व गायन कला जोपासणाऱ्या व्यक्तींचा ‘व्हाईस ऑफ चॉइस’ पुरस्काराने सन्मान करण्यात येतो, यंदा डॉ. विनय थोरात, शिवानी पांढरे, निलेश निकम, अॅड. शितल कुलकर्णी यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

पुढे बोलताना कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, पुणे आयडॉलच्या माध्यमातून पुणे शहरातील नवोदित गायकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची इच्छा दिवंगत नेते विनायकराव निम्हण यांची होती. त्यानुसार गेली अनेक वर्ष ही स्पर्धा सुरू आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, एखादा उपक्रम सुरु करणे सोपे असते. मात्र तो सातत्याने आणि तेव्हढ्याच दिमाखात सुरू ठेवणे कठीण आहे. परंतु स्वर्गीय आमदार विनायक निम्हण यांनी पुणे आयडॉल ही स्पर्धा सुरू केली अन् गेल्या 23 वर्षांपासून ही अशीच सुरू आहे. सनी निम्हण यांनी त्यांचा सामाजिक आणि राजकीय वारसा दोन्ही घेतला आहे. या स्पर्धेत पुणे शहरात व्यतिरिक्त इतर शहर आणि राज्यातून देखील स्पर्धक आलेले आहेत. यातच या स्पर्धेचे यश आहे.

धीरज घाटे म्हणाले, सांस्कृतिक नगरी असलेल्या पुणे शहरात नेहमीच सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असते. येथे गेली 23 वर्ष ही स्पर्धा सुरू आहे, हे कौतुकास्पद आहे.

प्रास्ताविक पर भाषणात सनी निम्हण म्हणाले, पुणे आयडॉल या स्पर्धेच्या अंतिम फेरीत 725 स्पर्धकांमधून 18 स्पर्धक निवडण्यात आले. त्यांची निवड करताना परीक्षकांचाच कस लागला आहे. पुणे आयडॉल ही केवळ स्पर्धा नसून आपले गायन कौशल्य सादर करण्याचे एक महत्वाचे व्यासपीठ बनले आहे.

पुणे आयडॉल स्पर्धेतील चारही गटाच्या प्रथम विजेत्यास 15 हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र तर द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी 10 हजार रुपये, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

अमित मुरकुटे, हेमंत कांबळे, अनिकेत कपोते, वनमाला कांबळे, संजय माजिरे, गणेश शेलार, संजय तरडे आदि कार्यकर्ते स्पर्धेच्या यशासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे परीक्षण ज्येष्ठ गायक राजेश दातार, गायक जितेंद्र भुरुक आणि मंजुश्री ओक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी आणि महेश गायकवाड यांनी तर उमेश वाघ यांनी आभार मानले.

पुणे आयडॉलचे विजेते

लिटिल चॅम्प
1. भार्गव जाधव
2. परी तेलंग

युवा आयडॉल

1 अभितांश श्रीवास्तव
2 नीव कनानी

जनरल आयडॉल
1 पियुष भोंडे
2 निखिल गर्गे

ओल्ड इज गोल्ड
1 सुनील यादव
2 मनोज मोरे

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments