Newsworldmarathi Pune: शालेय विद्यार्थी, तरुणाई, पालक व नागरिकांना कीर्तनाद्वारे प्रबोधनाकरीता न-हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस् तर्फे सहाव्या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार दिग्गज कीर्तनकार कीर्तन करणार असून दिनांक ३ ते ६ जून दरम्यान दररोज सायंकाळी ७ वाजता न-हे येथील प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल १ च्या प्रांगणात कीर्तन होणार असल्याची माहिती इन्स्टिटयूटस्चे उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर यांनी दिली.
कीर्तन महोत्सवाचे उद््घाटन मंगळवार, दिनांक ३ जून रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. दररोज सायंकाळी ६ ते ७ यावेळेत हरिपाठ होणार असून मंगळवारी (दि.३), सायंकाळी ७ वाजता ह.भ.प. सुनील महाराज निवंगुणे यांचे कीर्तन होणार आहे. दुस-या दिवशी बुधवारी (दि.४) सायंकाळी ७ वाजता ह.भ.प. अमृताश्रम महाराज स्वामी जोशी यांचे कीर्तन होणार आहे. यंदाचा कीर्तनकेसरी पुरस्कार अमृताश्रम महाराज स्वामी जोशी यांना प्रदान करण्यात येणार आहे.
तिस-या दिवशी गुरुवारी (दि.५) सायंकाळी ७ वाजता ह.भ.प. संतोष महाराज पायगुडे यांचे कीर्तन होणार आहे. महोत्सवाचा समारोप शुक्रवार, दिनांक ६ जून रोजी सकाळी १० वाजता शिवशंभु व्याख्याते, भागवत कथाकार ह.भ.प.गुरुवर्य राजेंद्र महाराज येप्रे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. महोत्सवाची सांगता दुपारी १२ ते २ यावेळेत महाप्रसादाने होणार आहे. ह.भ.प.येप्रे महाराज साधक वर्ग आणि समस्त ग्रामस्थ न-हेगाव यांनी संयोजनात सहभाग घेतला आहे.
अॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, शिक्षणमहर्षी प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटटस्च्या वतीने या सहाव्या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थी व तरुणवर्गाला आपल्या परंपरा, कला व संस्कृतीचे दर्शन व्हावे, याकरीता असे उपक्रम घेतले जातात. https://youtube.com/c/JadhavarGroupAdvShardulraoSudhakarraoJadhavar या लिंकवरुन कीर्तनांचा आनंद घेता येईल.
Recent Comments